अबब! 122 वर्षांपासून सतत जळतोय हा बल्ब, कधीच झाला नाही फ्युज
लिव्हरमोर, कॅलिफोर्निया येथील अग्निशमन केंद्रात एक बल्ब बसवला आहे (bulb in California fire station). हे शेल्बी इलेक्ट्रॉनिक नावाच्या कंपनीने बनवले आहे, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गेल्या 122 वर्षांपासून जळत आहे.
मुंबई : हिंदू धर्मात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे, मात्र अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेल्या 122 वर्षांपासून अखंड बल्ब जळत आहे. शास्त्रज्ञांच्या मते बल्बचा फिलामेंट 1 वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही तो वर्षभरात जळून खात होतो, मात्र या बल्बचा फिलामेंट 122 वर्षांपासून कार्यरत आहे. लिव्हरमोर, कॅलिफोर्निया येथील अग्निशमन केंद्रात एक बल्ब बसवला आहे (bulb in California fire station). हे शेल्बी इलेक्ट्रॉनिक नावाच्या कंपनीने बनवले आहे, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गेल्या 122 वर्षांपासून जळत आहे. या बल्बचे नाव सेंटेनिअल आहे, जो पहिल्यांदा 1901 मध्ये लावला होता आणि तेव्हापासून आजतागायत हा बल्ब जळत आहे. 1901 मध्ये हा बल्ब 60 वॅटचा होता. 2023 मध्ये या बल्बचा प्रकाश 4 वॅट इतकाच राहिला आहे.
1937 मध्ये करावा लागला होता बंद
2001 मध्ये या बॉलला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिलेल्या मुलाखतीत फायर स्टेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, 1937 मध्ये पॉवर लाईन बदलण्यासाठी हा बल्ब पहिल्यांदा बंद करण्यात आला आणि वायर बदलल्यानंतर हा बल्ब जळू लागला.
2013 मध्ये पुन्हा वाटले की बंद झाला
2013 मध्ये एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटले की हा बल्ब फ्यूज झाला आहे. पण नंतर कळलं की हा बल्ब फ्युज झालेला नाही. उलट तेथे लावलेली 76 वर्षे जुनी वायर खराब झाली आहे. वायर दुरुस्त केल्यानंतर हा बल्ब लावला तर तो पुन्हा जळू लागला. हा बल्ब जगभरात कुतूहलाचा विषय आहे. दूरवरून लोकं हा बल्ब पाहाण्यासाठी येतात.