Neeraj Chopra : भाला फेकल्यानंतर लगेचच नीरज चोप्रा साजरं करतो यश, नेमकं या मागचं कारण काय?
Neeraj Chopra Celebration : भालाफेकपटून नीरज चोप्रा याने आपल्या कामगिरीने भारताचं नाव उंचावलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड पटकावल्यानंतर आपली यशस्वी कामगिरी सुरुच ठेवली आहे.
मुंबई : भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 2023 वर्ल्ड अॅथलेटिक्समध्ये भारताला आणखी यश मिळवून दिलं आहे. त्यामुळे पुन्हा नीरज चोप्रा यांचा नावाचा उदो उदो सुरु झाला आहे. नीरजने 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. पण नीरज चोप्रा एका अॅक्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एकीकडे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली असताना नीरज चोप्रा भाला फेकल्या फेकल्या सेलिब्रेशन करण्यास सुरुवात करतो. भाला ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार याची त्याला आधीच खात्री असते आणि होतंही तसंच..त्यामुळे यश आधीच सेलिब्रेट करण्यामागे इतका आत्मविश्वास येतो कुठून असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. नीरज चोप्राला आपल्या प्रयत्नांमध्ये 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि भाला इच्छित ठिकाणी पोहोचणार याची खात्री असते. भाला फेकण्याच्या तंत्रामुळे इतका आत्मविश्वास येतो, असं सांगण्यात येत आहे.
वेगाने भाला फेकण्याचे तीन टप्पे
भाला फेकण्याचं नेमकं तंत्र काय? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. भाला फेकण्यासाठी गती, हवेची गती, दिशा, एयरोडायनेमिक्स, भाला फेकण्याची स्थिती महत्त्वाची असते. इतकंच काय तर भाला फेकताना गती आणि अँगल यावर लक्ष केंद्रीत करावं लागते. यापैकी एकही टप्पा चुकला तर भाला इच्छित ठिकाणी पोहोचणं कठीण होतं. वेगाने भाला फेकण्याचे तीन टप्पे आहेत.
India’s first-ever gold🥇at the #WorldAthleticsChampionships. It's a historic milestone for Indian sports. May your hard work keep shining in every tournament you represent 🇮🇳. @Neeraj_chopra1pic.twitter.com/hMeZLUrpNM
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 28, 2023
सहा ते दहा पावलं वेगाने धावल्यानंतर तीन पावलं क्रॉसओव्हर स्टेप घ्यावी लागते. ही स्थिती क्रिकेटमध्ये फास्ट बॉलरसारखी असते. शेवटच्या दोन ते तीन पावलात भाला फेकला जातो. यामुळे त्याला 100 किमी प्रतितास इतका वेग मिळतो. याला इम्प्लस स्टेप बोललं जातं. या दरम्यान पूर्ण शक्ती भाल्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न होते. शरीराची पूर्ण ऊर्जा खालून वर खांद्यापर्यंत येते. तसेच भाला फेकताना डोकं 32 ते 36 डिग्री अंशात असणं गरजेचं असतं. अशी स्थिती येण्यासाठी सातत्य आणि सराव लागतो.
नीरज चोप्रा याचं पुढचं लक्ष्य काय?
नीरज चोप्रा याच्या मते, थ्रो खेळाडूंसाठी कोणतीही फिनिश लाईन नसते. त्यामुळे येत्या काळात 90 मीटरहून अधिकचं लक्ष्य असणार आहे. पण सध्या दुखापतीमुळे हे लक्ष्य गाठण्यात अडचण येत आहे. पण एक दिवस या अडचणीवर मात करून नक्कीच यश मिळवेल.