CWG 2022 : भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी लढत, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला आतापर्यंत कुस्तीमध्ये अनेक पदकं मिळाली आहेत, मात्र आता क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे पदक निश्चित झाले आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG2022) सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना चांगली कामगिरी केली आहे. कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंनी (Indian Player) चांगली चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर पॅरा टेनिस टेबलमध्ये देखील काल खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भारतीय महिला क्रिकेट संघ देखील चांगली कामगिरी करताना दिसत आहे. काल त्यांनी पुन्हा चांगली कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारत (Indian cricket team) आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सुरुवातीला सामना झाला होता. मात्र या दोन संघात समाप्ती होईल असं सध्या चित्र आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होईल.दोन्ही देशांनी क्रिकेटमधील पदके निश्चित केली आहेत. पण सुवर्णपदक जिंकणार आणि कोण रौप्यपदक जिंकणार हे सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे.
India women’s cricket team enter the final of #CommonwealthGames2022 by beating England in the semifinal by 4 runs
हे सुद्धा वाचा(Photo courtesy: ICC) pic.twitter.com/wIaZW0I3Mv
— ANI (@ANI) August 6, 2022
सुवर्ण आणि रौप्यपदकाचा दावेदार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ
भारतीय महिला क्रिकेट संघाने झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या क्रिकेट संघातील ४ धावांनी पराभव केला. त्यानंतर भारताचं अंतिम फेरीत स्थान मजबूत झालं. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघाने न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव करत हे स्थान गाठले. क्रिकेट स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाचा दावेदार भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आहे. तर कांस्यपदकाची लढत इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
आज महत्त्वाची लढत
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला आतापर्यंत कुस्तीमध्ये अनेक पदकं मिळाली आहेत, मात्र आता क्रिकेटमध्येही टीम इंडियाचे पदक निश्चित झाले आहे. शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने 4 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी लढत होईल. इथे पराभव झाला तरी रौप्य नक्कीच आहे. कालचा सामना अतिशय रोमांचक वळणावर संपला आणि शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचलेल्या सामन्यात टीम इंडियाने फायनलचे तिकीट मिळवले. इंग्लंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज होती आणि स्नेह राणाने टीम इंडियासाठी आघाडी घेतली. केवळ 9 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. यासह भारताने हा सामना जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.