Wtc Final 2023 | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, टीम इंडिया फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा अपयशी

Wtc Final 2023 AUS vs IND 5th Day | ऑस्ट्रेलियाने लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरली आहे.

Wtc Final 2023 | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, टीम इंडिया फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा अपयशी
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 5:35 PM

लंडन | ऑस्ट्रेलियाने लंडनमध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरली आहे. लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप महाअंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला दुसऱ्या डावात 234 धावांवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलिया यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची गदा जिंकणारी न्यूझीलंडनंतर दुसरी टीम ठरली.

टीम इंडियाची दुसरी इनिंग

टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मा याने 43 धावा केल्या. शुबमन गिल दुर्देवी ठरला. शुबमन 18 धावा करुन माघारी परतला. चेतेश्वर पुजारा बेजबाबदार शॉट मारुन 27 रन्सवर आऊट झाला. विराट कोहलीने 49 धावांचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणे याने 46 धावांची झुंजार खेळी केली. रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर झिरोवर आऊट झाले. केएस भरत याने 23 धावा केल्या. मोहम्मद शमी 13 धावांवर नाबाद राहिला. मोहम्मद सिराज आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी 1-1 धाव केली.

ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. स्कॉट बोलंड याने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क याने 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

टीम इंडियाचं स्वप्न भंगलं

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव

ऑस्ट्रेलियाला 173 धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात 8 वी विकेट गमावताच 84.3 ओव्हरमध्ये 270 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताला विजयासाठी 444 धावांचं आव्हान मिळालं. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले. मात्र एलेक्स कॅरे याने तेवढं तंगवलं.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅरेने सर्वाधिक 66 धावांची नाबाद खेळी केली. त्याशिवाय मार्नस लाबुशेन आणि मिचेल स्टार्क या दोघांनी प्रत्येकी 41 धावांचं योगदान दिलं. स्टीव्हन स्मिथ 34 धावा करुन माघारी परतला. कॅमरुन ग्रीनने 25 धावा जोडल्या. ट्रेव्हिस हेड याने 18 तर उस्मान ख्वाजाने 13 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर 1 तर कॅप्टन पॅट कमिन्स 5 रन्स करुन आऊट झाला.

टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना चालता केला. तर मोहम्मद सिराज याने 1 विकेट घेतली.

टीम इंडियाची पहिल्या इनिंगमधील बॅटिंग

टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात 69 ओव्हरमध्ये 296 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या युवा आणि अनुभवी फलंदाजांनी हिरमोड केला. हे चौघेही झटपट आऊट झाले.

रोहित शर्मा 15 धावांवर आऊट झाला. तर त्यापाठोपाठ शुबमन गिल याने 13 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आयपीएलमध्ये हिरो ठरलेल्या शुबमनने घोर निराशा केली.

सलामी जोडी झटपट आऊट झाल्याने टीम इंडिया आता अडचणीत सापडली. सलामी जोडी आऊट झाल्याने टीम इंडियाची 2 बाद 30 अशी स्थिती झाली. तर दुसऱ्या सत्रातील खेळ संपला तोवर भारताने 10 ओव्हरमध्ये 2 बाद 37 धावा केल्या. तिसऱ्या सत्रात विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या जोडीकडून अपेक्षा होत्या. मात्र या दोघांनीही निराशा केली. पुजारा आणि विराट दोघेही प्रत्येकी 14 धावा करुन माघारी परतले.

त्यानंतर रहाणे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 100 बॉलमध्ये 71 रन्सची पार्टनरशीप केली. या 71 धावांच्या भागीदारीत जडेजा याने 48 तर रहाणे याने 15 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर जडेजा 48 धावांवर आऊट झाला. त्यानंतर केएस भरत मैदानात आला. केएस आणि रहाणे दुसऱ्या दिवशी नाबाद परतले. मात्र तिसऱ्याच दिवशी मैदानात येताच दुसऱ्या बॉलवर केएस आऊट झाला.

शार्दुल-रहाणे जोडीने सावरलं

केएसनंतर शार्दुल मैदानात आला. शार्दुलने याआधीही ओव्हलवर अर्धशतक ठोकलंय. त्यामुळे शार्दुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. शार्दुलने निराशा केली नाही. शार्दुलने रहाणेला चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. रहाणेने 129 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 89 धावांची खेळी केली.

रहाणे आऊट झाल्यानंतर ठाकुरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. ठाकुरने काही फटके मारुन आपलं चौथं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर उमेश यादव आऊट 5 धावांवर आऊट झाला. अर्धशतक केल्यानंतर शार्दुल ठाकुरच्या शानदार खेळीचा द एन्ड झाला. शार्दुलने 109 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. शार्दुलनंतर शमी 13 धावांवर आऊट झाला आणि टीम इंडिया ऑलआऊट झाली.

ऑस्ट्रेलियाकडून बॉलिंग केलेल्या पाचच्या पाच गोलंदाजांनी विकेट घेतल्या. पॅट कमिन्स याने सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. बोलँड, मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नेथन लायन याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

दरम्यान त्याआधी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या. स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.

या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या. उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.

तर टीम इंडियाकडून पहिल्या डावात मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवलं. तर रविंद्र जडेजा याने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. तर मोहम्मद शमी याच्या जागी सब्टीट्युड आलेल्या अक्षर पटेल याने मिचेल स्टार्क याला रनआऊट केलं.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.