Ajit Pawar | रात्री 2 वाजेपर्यंत चालली बैठक, शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये 3 तासाच्या चर्चेनंतर अखेर काय ठरलं?
Ajit Pawar | आता तिसऱ्या भिडूला सत्तेतला वाटा द्यावा लागणार आहे, त्यामुळे भाजपा-शिवसेना दोघांना काही तडजोडी कराव्या लागतील. शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालय.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का दिला. ते एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. हा शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सत्तेत सहभागी झाल्याने सरकार अजून भक्कम झालं आहे. पण आता तिसऱ्या भिडूला सत्तेतला वाटा द्यावा लागणार आहे, त्यामुळे भाजपा-शिवसेना दोघांना काही तडजोडी कराव्या लागतील.
शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालय. हे सरकार अस्तित्वात आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे. खरंतर शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेणं अपेक्षित होतं.
कधी जाहीर होणार खातेवाटप?
पण मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांना अजून खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खाते वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या आमदारांचा अजित पवार यांना अर्थ खात द्यायला विरोध आहे. कारण निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा या आमदारांचा आक्षेप आहे. त्याच मुद्यावरुन बंड करुन त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. आता अजित पवार यांच्याकडे पुन्हा अर्थ खात नको, अशी त्यांची भूमिका आहे. पण अर्थ मंत्रालया अजित पवार यांच्याकडे गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्रिशूळमध्ये 3 तास चर्चा
दरम्यान काल रात्री 12 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. तब्बल 3 तास ही बैठक सुरु होती. अजित पवार आपल्या निवासस्थानी निघून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावरच होते. शिंदे-फडणवीसांमध्ये चर्चा सुरु होती. शिंदे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाली. निदान आता तरी खातेवाटपाचा तिढा सुटला असेल, अशी अपेक्षा आहे. कारण मंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार बिनखात्याचे मंत्री आहेत.