IPL 2022 मधून KKR OUT झाल्यानंतर Shreyas Iyer घरी आला, बहिणी सोबत डान्स केला, पहा VIDEO

IPL 2022: श्रेयसने छोट्या बहिणीसोबत मिळून एक इंटरेस्टिंग रील बनवली आहे. दोघे भाऊ-बहिण या रीलमध्ये 'My Money Don't Jiggle, Jiggle' या गाण्यावर डान्स करताना दिसतात.

IPL 2022 मधून KKR OUT झाल्यानंतर Shreyas Iyer घरी आला, बहिणी सोबत डान्स केला, पहा VIDEO
shreyas iyer dance Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 12:59 PM

मुंबई: दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सला यंदाच्या सीजनमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या KKR ने 14 पैकी फक्त सहा सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे प्लेऑफमध्ये त्यांना स्थान मिळवता आलं नाही. टीम IPL प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेल्यानंतर श्रेयस अय्यरही घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यानंतर श्रेयसने स्वत:ला मानसिक दृष्टया रिफ्रेश करण्याकडे लक्ष दिले आहे. घरी आल्यानंतर श्रेयसने छोट्या बहिणीसोबत मिळून एक इंटरेस्टिंग रील बनवली आहे. दोघे भाऊ-बहिण या रीलमध्ये ‘My Money Don’t Jiggle, Jiggle’ या गाण्यावर डान्स करताना दिसतात. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं.

यंदाच्या सीजनमध्ये श्रेयसने किती धावा केल्या?

श्रेयसने आयपीएल 2022 मध्ये 14 सामन्यात 30.84 च्या सरासरीने 401 धावा केल्या. यात तीन अर्धशतकं आहेत. श्रेयस अय्यर मागच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळायचा.

हे सुद्धा वाचा

श्रेयस 101 सामने खेळला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स 2020 साली पहिल्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली होती. 27 वर्षांचा श्रेयस आतापर्यंत आयपीएलचे 101 सामने खेळला आहे. 31.25 ची सरासरी 125.38 च्या स्ट्राइक रेटने 2776 धावा केल्या आहेत. आयपीएल करीयरमध्ये त्याने आतापर्यंत 19 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी 4 कसोटी, 26 वनडे आणि 36 टी 20 इंटरनॅशनल सामने खेळला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shresta Iyer (@shresta002)

सोशल मीडियावर श्रेष्ठा Active

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यर सोशल मीडियावर खासकरुन इन्स्टाग्रावर मोठ्या प्रमाणात Active आहे. श्रेष्ठा बऱ्याचदा तिचे डान्स व्हिडिओ आणि रील्स पोस्ट करत असते. श्रेयस आणि श्रेष्ठा दोघेही सोशल मीडियावर परस्परांचे थ्रो बॅक आणि लेटेस्ट फोटोज पोस्ट करत असतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.