IPL2022final : फायनलची सुरुवात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने, GtvsRR च्या मॅचपूर्वी बीसीसीआयने रचला इतिहास

फिकट निळ्या रंगाच्या जर्सीवर आयपीएलच्या 15 वर्षांची माहिती देण्यात आली होती.आणि त्यामध्ये सर्व 10 संघांचे लोगोही लावण्यात आले होते. ही जर्सी 66 मीटर लांब आणि 42 मीटर रुंद आहे.

IPL2022final : फायनलची सुरुवात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने, GtvsRR च्या मॅचपूर्वी बीसीसीआयने रचला इतिहास
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:02 PM

मुंबईः जगातील सर्वात मोठ्या T20 स्पर्धेचा आणखी एक हंगाम संपत आला आहे, IPL चा दीर्घ आणि रोमांचक हंगामानंतर, आता आयपीएल 2022 त्याच्या शेवटच्या सामन्यासाठी सज्ज आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यातील अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा अंतिम सामना खास बनवण्यासाठी विशेष व्यवस्था केली. हा अंतिम सामना खास असल्याने जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Cricket Stadium Narendra Modi Stadium) आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला. तीन वर्षांनंतर प्रथमच आयपीएलच्या समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले असून या समारंभात बीसीसीआयने (BCCI) जगातील सर्वात मोठी क्रिकेट जर्सी सादर करून विक्रमही नोंदविला आहे.

लीगची यशाची शिखरं

2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली अगदी तेव्हापासून ही लीग सातत्याने यशाच्या शिखरं पार करत आहे. त्यामध्ये आठ संघांवरून 10 संघांची वाढ झाली आहे. तर यावेळी अंतिम फेरीसह 74 सामने खेळले गेले. या लीगचा हा 15 वा हंगाम सुरु आहे, त्यामुळे 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल BCCI कडून जगातील सर्वात मोठी क्रिकेट जर्सी सादर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. बीसीसीआयने ही जर्सी फायनलपूर्वीच्या कार्यक्रमामध्येत सादर केली. जी अनेक कलाकारांनी एकत्र पकडली होती.

जर्सीवर आयपीएलच्या 15 वर्षांची माहिती

या फिकट निळ्या रंगाच्या जर्सीवर आयपीएलच्या 15 वर्षांची माहिती देण्यात आली होती.आणि त्यामध्ये सर्व 10 संघांचे लोगोही लावण्यात आले होते. ही जर्सी 66 मीटर लांब आणि 42 मीटर रुंद आहे. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ज्यांनी तीन अधिकाऱ्यांना सर्वात मोठी जर्सी प्रमाणपत्र देऊन या विक्रम जाहीर करण्यात आला.

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही, मात्र गुजरात टायटन्सने अल्झारी जोसेफच्या जागी दुसरा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. राजस्थानने तब्बल 14 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. 2008 मध्ये झालेल्या पहिल्याच सत्रात संघाने हे विजेतेपद पटकावले होते. त्याचवेळी गुजरात टायटन्सने पहिल्या सत्रात पदार्पण करत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.