IND vs SA: ऋषभ पंतला बॉलर्सचा वापर करता येत नाही, आशिष नेहराने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

IND vs SA: पहिल्या T 20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) सात विकेट राखून भारतावर विजय मिळवला आहे.

IND vs SA: ऋषभ पंतला बॉलर्सचा वापर करता येत नाही, आशिष नेहराने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत-रिकी पाँटिंग Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 7:35 PM

मुंबई: पहिल्या T 20 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) सात विकेट राखून भारतावर विजय मिळवला आहे. पहिल्या पराभवानंतर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने (Ashish nehra)पंतच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. युजवेंद्र चहलकडून फक्त 2.1 ओव्हर गोलंदाजी करुन घेण्याच्या पंतच्या रणनितीने नेहरा हैराण झाला आहे. आयपीएल 2022 मध्ये पर्पल कॅप मिळवणाऱ्या युजवेंद्र चहलने फक्त 13 चेंडू टाकले. त्यात त्याने 26 धावा दिल्या. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतने कुलदीप यादवकडूनही पूर्ण षटकं गोलंदाजी करुन घेतली नव्हती. कुलदीप हा यंदाच्या आयपीएल सीजनमधला दिल्लीकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. रासी वॅन डर डुसे आणि डेविड मिलरची जोडी फोडण्यासाठी ऋषभ पंतने चहलकडे चेंडू सोपवायला पाहिजे होता.

बचावात्मक गोलंदाजी करुन फायदा नाही

पहिल्या सामन्यात भारताने खराब गोलंदाजी बरोबर सुमार फिल्डिंगही केली. भारताने अनेक महत्त्वाचे झेल सोडले. क्रिकबजशी बोलताना नेहरा म्हणाला की, “पंत एक युवा कॅप्टन आहे. तो यातून शिकेल व अधिक सुधारणा करेल. चहलने फक्त 2.1 षटकं गोलंदाजी केली. मधल्या षटकात विकेट काढण्याचा पर्याय असला पाहिजे. तुम्हाला महत्त्वाच्या फलंदाजाचा रोखायचं असेल, तर तुम्हाला त्याचा विकेट काढावा लागेल. बचावात्मक गोलंदाजी करुन काहीही साध्य होणार नाही”

दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य

भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने पाच चेंडू बाकी ठेवून सात विकेटने सामना जिंकला. मिलर आणि डुसेने शानदार शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. भारताकडून इशान किशनने सर्वाधिक 76 धावा केल्या. कॅप्टन पंतने 29 धावा केल्या. हार्दिक पंड्याने 12 चेंडूत 31 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.