IND vs ENG: दीपक हुड्डा सुसाट, दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिल्या टी 20 मध्ये मोठा विजय

IND vs ENG: आयर्लंड दौऱ्यात (Ireland Series) टी 20 सीरीज मध्ये निर्भेळ यश संपादन करुन भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. काल पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने डर्बीशायरवर मोठा विजय मिळवला.

IND vs ENG: दीपक हुड्डा सुसाट, दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिल्या टी 20 मध्ये मोठा विजय
deepak-HoodaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 7:54 AM

मुंबई: आयर्लंड दौऱ्यात (Ireland Series) टी 20 सीरीज मध्ये निर्भेळ यश संपादन करुन भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. काल पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने डर्बीशायरवर मोठा विजय मिळवला. दीपक हुड्डा सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. त्यानेच भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सराव सामन्यासाठी दिनेश कार्तिककडे (dinesh Karthik) संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. डर्बीशायर संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये भारतीय संघासमोर विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 20 चेंडू बाकी राखून आणि तीन विकेट गमावून हे लक्ष्य पार केले. आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये शानदार शतक झळकावणाऱ्या दीपक हुड्डाने (Deepak Hooda) पुन्हा एकदा शानदार प्रदर्शन केलं. त्याने 37 चेंडूत 59 धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या. संजू सॅमसनने 38 रन्स केल्या.

ऋतुराज गायकवाडचा फॉर्म चिंतेचा विषय

दुखापतीमुळे आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये फलंदाजीची संधी न मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने फक्त 3 धावा केल्या. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात तो फलंदाजी करु शकला नव्हता. दुसऱ्या सामन्यात तो बाहेर होता. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी ऋतुराज गायकवाडची संघात निवड झालीय. पण त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यात त्याला संधी मिळाली. पण फक्त एकाच मॅचमध्ये त्याने 57 धावांची खेळी केली.

भारतीय गोलंदाजांसमोर फलंदाज हतबल

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला डर्बीशायरच्या फलंदाजांना चांगलच सतावलं. अक्षर पटेलने 3 रन्सवरच लुइस रीसला बाद करुन डर्बीशायरला पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शदीप सिंहने 22 रन्सवर दुसरी विकेट काढली. त्याने डर्बीशायरचा कॅप्टन आणि पाकिस्तानचा स्टार शान मसूदला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केलं. दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर ल्यूस डू सुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतला. वेन मॅडसेन (28), हिल्टन कार्टराइट (27), ब्रुक गेस्ट (23) एलेक्स ह्यूज (24) आणि मॅटी मॅककिर्नन नाबाद 20 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी डर्बीशायरच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. अर्शदीप सिंह-उमरान मलिकने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल, वेंकटेश अय्यरने एक-एक विकेट घेतली.

हे सुद्धा वाचा

परदेशतील खेळपट्ट्यांवर दीपक हुड्डा सुसाट

151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवता चांगली झाली नव्हती. 5 धावांवर ऋतुराज गायकवाडच्या रुपाने पहिला झटका बसला होता. त्यानंतर संजू सॅमसन (28), दीपक हुड्डा (59), सूर्यकुमार यादव नाबाद (36) आणि दिनेश कार्तिक नाबाद (7) यांच्या फलंदाजीच्या बळावर भारताने पहिल्या सराव सामन्यात विजय मिळवला. परदेशात दिपक हुड्डा शानदार खेळतोय. आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात त्याने नाबाद 47 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या टी 20 मध्ये त्याने शानदार शतक झळकावलं होतं. आता डर्बीशायर विरुद्धही त्याचा तोच फॉर्म कायम आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.