IND vs SA T 20 Match: ‘या’ तीन कारणांमुळे टीम इंडियाने ‘करो या मरो’ मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय

विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना झाला. भारतासाठी आजचा सामना 'करो या मरो' होता. काहीही करुन भारताला आज विजय मिळवण आवश्यक होतं.

IND vs SA T 20 Match: 'या' तीन कारणांमुळे टीम इंडियाने 'करो या मरो' मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मिळवला विजय
India win against SaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:51 PM

मुंबई: विशाखापट्टनम येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) तिसरा टी 20 सामना झाला. भारतासाठी आजचा सामना ‘करो या मरो’ होता. काहीही करुन भारताला आज विजय मिळवण आवश्यक होतं. कारण पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Africa Team) 2-0 ने आघाडीवर होता. आजचा सामना हरला, तर दक्षिण आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी झाली असती. त्यामुळे भारताला आज सामना जिंकावाच लागणार होता. भारतीय संघाने आज अपेक्षित कामगिरी केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर (south Africa) पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दक्षिण आफ्रिकेला कुठेही डोक वर काढण्याची संधी दिली नाही. पूर्णपणे सामन्यावर नियंत्रण गाजवलं. ‘करो या मरो’, सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 48 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित 20 षटकात 131 धावांवर ऑलआऊट झाला.

  1. भारताचे सलामीवर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनने दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या 10 षटकात भारताच्या एक बाद 97 धावा झाल्या. पावरप्लेमध्येच भारताच्या बिनबाद 57 धावा झाल्या होत्या. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या ऋतुराज गायकवाडने आज मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. पावरप्लेमध्ये भारताला चांगली सुरुवात मिळत नव्हती. ती आज मिळाली. त्याच्या झंझावातामुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण करता आला. ऋतुराजने 35 चेंडूत 57 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत. ऋतुराजला संपूर्ण आयपीएलच्या सीजनमध्ये लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आज त्याने ती भरपाई केली. इशान किशननेही 35 चेंडूत 54 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. दोघांनी मजबूत धावसंख्येचा पाया रचला.
  2. श्रेयस अय्यर (14), इशान किशन (54) कॅप्टन ऋषभ पंत (6) आणि दिनेश कार्तिक (6) झटपट आऊट झाले. त्यामुळे भारतावर दबाव होता. त्यावेळी उपकर्णधार हार्दिक पंड्याने 21 चेंडूत नाबाद 31 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे भारताला 179 धावांपर्यंत पोहोचता आले.
  3. गोलंदाजी भारताची मुख्य डोकेदुखी ठरली होती. पण आज गोलंदाजांनी आपल्या कामगिरीचा स्तर उंचावला. मागच्या दोन सामन्यात मार खाणाऱ्या युजवेंद्र चहलने चार षटकात 20 धावा देत 3 विकेट काढल्या. हर्षल पटेलने 19 चेंडूत 25 धावा देत चार विकेट काढल्या. भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी टिच्चून मारा केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. सुरुवातीपासून त्यांच्यावर दबाव राहिला. अखेरीस त्यांचा डाव 131 धावात आटोपला.
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.