Ind Vs Sa 2nd T20 : 100 धावांच्या आधीच निम्मी टीम तंबूत परतली, आफ्रिकेला 149 धावांचं आव्हान, भेदक माऱ्यासमोर लोटांगण

भारतीय संघाने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 42 धावा केल्या. त्यानंतर मात्र भारतीय संघ हा ढासळतच गेला. टीम इंडियाने 148 धावा करत आफ्रिकेला  विजयाशी 149 धावांचं आव्हान दिलं आहे.

Ind Vs Sa 2nd T20 : 100 धावांच्या आधीच निम्मी टीम तंबूत परतली, आफ्रिकेला 149 धावांचं आव्हान, भेदक माऱ्यासमोर लोटांगण
IND vs SA
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 8:45 PM

कटक : आज टीम इंडियाचा (Ind Vs Sa) मुकाबला हा साऊथ आफ्रिकेसोबत कटकमध्ये टी-20 (2nd T20) होत आहे. मात्र भारतीय संघाची सुरूवातील बॅटिंग करताना खराब सुरूवात (Indian Cricket Team) झाली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड तंबूत परतला. त्यानंतर ईशान किशान आणि श्रेयस अय्यने काही काळ मोर्चा संभाळला. यावेळी इशान किशानचे काही जबरदस्त फटकेही पाहायला मिळाले. मात्र इशान किशान बाद होताच भारताचा डाव पुन्हा गडगडला. एवढेच नाही तर 100 धावांच्या आधीच निम्मी टीम तंबूत परतली होती. त्यामुळे भारताला समाधानकारक धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला देता आले नाही. भारतीय संघाने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 42 धावा केल्या. त्यानंतर मात्र भारतीय संघ हा ढासळतच गेला. टीम इंडियाने 148 धावा करत आफ्रिकेला  विजयाशी 149 धावांचं आव्हान दिलं आहे.

बीसीसीआयचं ट्विट

रबाडाच्या बॉलिंगसमोर लोटांगण

भारतीय संघाने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 42 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने त्याच्या दुसर्‍या ओव्हरमद्ये फक्त 1 धाव दिली. इशान किशनला नोर्कियाने झेलबाद केले आणि त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रसी व्हॅन डर ड्युसेनने कॅच आऊट केले. इशानने 21 चेंडूत 34 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

एकापाठोपाठ एक विकेट

भारताने 7 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 50 धावा केल्या. नॉर्केच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने सिगल घेत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. 68 च्या धावसंख्येवर भारताची तिसरी विकेट पडली. कर्णधार ऋषभ पंत 5 धावा करून बाद झाला. केशव महाराजच्या पहिल्या ओव्हच्या सुरुवातीच्या चेंडूवर डुसेनने पंतला बाद केले. त्याने 7 चेंडूंचा सामना केला. 90 धावांच्या धावसंख्येवर भारताला चौथा धक्का बसला तो हार्दिक पांड्या वेन पारनेलच्या गोलंदाजीवर. हार्दिकने 12 चेंडू खेळले आणि 1 चौकार मारला.

शेवटच्या काही ओव्हरमध्ये कार्तिकची फटकेबाजी

98 धावांपर्यंत भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यर ड्वेन प्रिटोरियसकरवी हेन्रिक क्लासेनच्या हाती कॅच देत बाद झाला. अय्यरने 35 चेंडूत 2 चौकार आणि षटकार लगावत 40 धावा केल्या. भारताचा संघ अडचणीत असताना हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिकच्या जोडीने शेवटी मोर्चा संभाळला. त्यामुळे टीम इंडियाला आव्हानात्मक रन्सपर्यंत मजल मारता आली. अन्यथा टीम इंडियाचा मार्ग काही काळ तरी खडतर दिसत होता. सुरूवातीच्या ओव्हारमध्ये सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडला सूर न गवसणेही टीमसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.  आता भारतीय गोलंदाजांसमोर आफ्रिकेची चांगली फलंदाजी रोखण्याचं आव्हान असणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.