सौंदर्यानेच ‘तिचा’ घात केला, महिला खेळाडूला येतायत ‘नको त्या ऑफर’

चार लोक आपल्या सौंदर्याची चर्चा करतात ही भावनाच मनाला प्रफुल्लित करुन जाते. पण काही वेळा हे सौदर्यच शत्रू बनतं.

सौंदर्यानेच 'तिचा' घात केला, महिला खेळाडूला येतायत 'नको त्या ऑफर'
ana maria markovicImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:01 PM

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर (Beautiful) दिसाव असं वाटतं. आपल्या सौंदर्याची चर्चा व्हावी अशी इच्छा असते. एखादी व्यक्ती वजनाने जाड असली, तरी सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. कारण आपण सुंदर दिसतो, चार लोक आपल्या सौंदर्याची चर्चा करतात ही भावनाच मनाला प्रफुल्लित करुन जाते. पण काही वेळा हे सौदर्यच शत्रू बनतं. मारिया मार्कोविच या महिला खेळाडूच्या बाबतीत नेमकं हेच घडतय. तिला आता आपल्या सौंदर्याचीच चीड येऊ लागली आहे. मारिया मार्कोविच (Maria Markovic) ही क्रोएशियाची महिला फुटबॉलपटू आहे. एना मारिया मार्कोविचची जगातील सुंदर महिला फुटबॉलपटूंमध्ये (Football) गणना होते. पण हेच सौंदर्य आता मात्र तिची डोकेदुखी बनत चाललय. क्रोएशियाच्या महिला फुटबॉलरला सोशल मीडियावर सतत घाणेरडे, नको ते मेसेज येत असतात. इतकचं नाही, तिला एडल्ट फिल्म आणि एडल्ड मॅगजीनच्या सुद्धा ऑफर येतात. या सगळ्याला मारिया आता कंटाळली आहे.

किती वर्षांची आहे?

एना मारिया मार्कोविच अवघ्या 22 वर्षांची आहे. ती क्रोएशियाच्या राष्ट्रीय संघाशिवाय स्वीस वुमेन्स सुपर लीगमध्ये ग्रासहॉपर क्लबकडून खेळते. फॉरवर्ड पोजिशनवर ती खेळते. एनाने वयाच्या 14 व्या वर्षापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. तिचा जन्म क्रोएशियामध्ये झाला होता. पण वयाच्या 12 व्या वर्षी तिच कुटुंब स्वित्झर्लंडच्या झ्युरिख शहरात स्थायिक झालं.

एना मारिया किती सामने खेळलीय?

एना मारिया मार्कोविच स्वित्झर्लंडत्या ग्रासहॉपर क्लबकडून खेळत असताना, क्रोएशियन फुटबॉल फेडरेशनची तिच्यावर नजर पडली. त्यानंतर क्रोएशियाच्या राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी मिळाली. मार्कोविचने आतापर्यंत फक्त 5 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. मालडोवा विरुद्धच्या सामन्यात तिने गोल डागला होता.

हे सुद्धा वाचा

कुठला फुटबॉलपटू आवडतो?

क्रिस्टियानो रोनाल्डो तिचा आवडता फुटबॉलपटू आहे. क्रोएशियाचा फुटबॉलपटू लुका मॉड्रिचही तिला आवडतो. क्लब लेवलच्या सामन्यात एनाने 66 सामन्यात 22 गोल डागलेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.