Kieron Pollard याची राक्षसी ताकद, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 4 सिक्स, 3 वेळा बॉल 100 मीटरपेक्षा जास्त लांब
Kieron Pollard Sixes | कायरन पोलार्ड याने आपल्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर पुन्हा एकदा टीमला विजय मिळवून दिलाय.
सेंट किट्स | वेस्ट इंडिजचा माजी स्टार ऑलराउंडर कायरन पोलार्ड हा त्याच्या राक्षसी ताकदीसाठी ओळखला जातो. पोलार्डने आपल्या धमाकेदार बॅटिंग कौशल्याच्या जोरावर आतापर्यंत अनेकदा विंडिजला अशक्य सामन्यात विजय मिळवून दिला आहे. पोलार्डने हाच झंझावात लीग क्रिकेटमध्येही कायम राखला. पोलार्डने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमसाठी बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर प्रशंसनीय कामगिरी केली. पोलार्डने आपला हा तडाखा कॅरेबियन प्रीमिअर लीग 2023 मध्येही कायम ठेवलाय. पोलार्डने 27 ऑगस्टला झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सेंट किट्स विरुद्ध नेविस पॅट्रियट्स यांच्यात सामना पार पडला. पोलार्डने या सामन्यात सिक्सचा पाऊस पाडला. पोलार्ड सामना रंगतदार स्थितीत असताना बॅटिंगसाठी आला. पोलार्डने एकाच ओव्हरमध्ये सलग 4 गगनचुंबी सिक्स ठोकत मॅच आपल्या बाजूने फिरवली. पोलार्डने फक्त 16 बॉलमध्ये 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. पोलार्डच्या या खेळीमुळे टीकेआरने 179 धावांचं आव्हान 17.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
टीकेआरने 179 धावांचं पाठलाग करताना सुरुवातीला काही विकेट्स गमावले. मात्र त्यानंतर निकोलस पूरन याने खणखणीत अर्धशतक ठोकल्याने टीकेआर सुरक्षित स्थितीत पोहचली. पोलार्ड सामन्याच्या 12 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला. पोलार्डने आपल्या ट्रेडमार्क पद्धतीने फटकेबाजीला सुरुवात केली आणि टीमला विजय मिळवून दिला.
एका ओव्हरमध्ये 28 धावा
पोलार्डने 15 व्या ओव्हरमध्ये टॉप गिअर टाकला. पोलार्डने लेग स्पिनर इजहारुलहक नवीद याला फोडून काढला. इजहारुलहक याने शॉट पिच बॉल टाकल्याने पोलार्डला शॉट मारण्यासाठी हवा तितका वेळ मिळाला. पोलार्डने ठोकलेल्या 4 पैकी 3 सिक्स हे 100 मीटर पेक्षा लांब गेले. तर चौथा सिक्स हा 95 मीटर लांब गेला. पोलार्डच्या याने 4 सिक्ससह इजहारुलहक याच्या ओव्हरमध्ये 28 धावा केल्या आणि सामना फिरवला.
कायरन पोलार्ड याचा तडाखा
– 101 meter six. – 107 meter six. – 102 meter six. – 95 meter six.
Kieron Pollard smashed 4 sixes in a single over – The brute force. pic.twitter.com/A6qzsynC8l
— Johns. (@CricCrazyJohns) August 28, 2023
सेंट किट्स प्लेईंग इलेव्हन | शेरफेन रदरफोर्ड (कॅप्टन), आंद्रे फ्लेचर, एव्हिन लुईस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेड गुली, डॉमिनिक ड्रेक्स, कोफी जेम्स, कॉर्बिन बॉश, इझारुलहक नावेद, शेल्डन कॉट्रेल आणि आशीर्वाद मुझाराबानी.
त्रिनबागो नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन | किरॉन पोलार्ड (कर्णधार), मार्टिन गप्टिल, लॉर्कन टकर (विकेटकीपर), चॅडविक वॉल्टन, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरेन, अकेल होसेन, अली खान आणि जयडेन सील्स.