The 6ixty: तिचा लांब लचक SIX पाहून तुम्हीच म्हणालं, एकदम ‘कडक’, पहा VIDEO

वेस्ट इंडिजच्या (West indies) भूमीवर The 6ixty ही नवीन क्रिकेट लीग स्पर्धा सुरु झाली आहे. ख्रिस गेल या लीगचा सर्वात मोठा चेहरा आहे.

The 6ixty: तिचा लांब लचक SIX पाहून तुम्हीच म्हणालं, एकदम 'कडक', पहा VIDEO
The 6sixtyImage Credit source: VideoGrab
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 6:30 PM

मुंबई: वेस्ट इंडिजच्या (West indies) भूमीवर The 6ixty ही नवीन क्रिकेट लीग स्पर्धा सुरु झाली आहे. ख्रिस गेल या लीगचा सर्वात मोठा चेहरा आहे. या लीगचा पहिला सामना खेळण्याआधीच गेलने लांबलचक षटकार खेचण्याचा दावा केला आहे. गेल फक्त बोललाय, पण त्याच्याआधी एका फलंदाजाने प्रत्यक्षात हे करुन दाखवलय. या फलंदाजाच नाव आहे, क्लो ट्रायॉन. दक्षिण आफ्रिकेच्या या महिला फलंदाजाने The 6ixty मध्ये एक कडक सिक्स मारला. महिला संघांमध्ये सामना सुरु होता. क्लो ट्रायॉन (chloe tyron) इतका लांबलचक सिक्स मारला की, चेंडू फक्त सीमारेषाच नाही, तर चेंडू स्टेडियमच्या छपरावर जाऊन हरवला. म्हणजे गेलच्या आधी क्लो ट्रायॉनने The 6ixty मध्ये रंगत भरली. बारबाडोस रॉयल्स आणि गुयाना अमेजॉन मध्ये सामना होता. बारबाडोसने प्रथम फलंदाजी करताना 58 धावा बनवल्या. प्रत्युत्तरात गुयाना अमेजॉनने 1 विकेट गमावून 59 धावांचे विजयी लक्ष्य गाठले. गुयानाने हा सामना 12 चेंडू आणि 5 विकेट राखून जिंकला.

गेलच्या आधी क्लो ट्रायॉनचा सिक्स पाहा

क्लो ट्रायॉन बारबाडोस रॉयल्सकडून खेळत होती. त्यांचा संघ हरला पण क्लो ट्रायॉनने सर्वांच मन जिंकून घेतलं. तिने मारलेल्या एका कडक सिक्सची जोरदार चर्चा आहे. क्लो ट्रायॉन आपल्या संघाची सर्वात यशस्वी फलंदाज ठरली. ती अशी एकमेव फलंदाज आहे, जी दोन आकडी धावसंख्या गाठू शकली. तिने 17 चेंडूत 24 धावा फटकावल्या. या दरम्यान मारलेल्या एका षटकाराची जोरदार चर्चा आहे.

क्लो ट्रायॉनने 86 मीटर लांब मारला सिक्स

क्लो ट्रायॉन 86 मीटर लांब सिक्स मारला. चेंडू थेट स्टेडियमच्या छपरावर जाऊन पडला. तिथून तो चेंडू आणणं सोपं नव्हतं. एका प्रकारे तिने आपल्या षटकाराने चेंडूच हरवून टाकला. The 6IXTY मध्ये आजपासून पुरुषांचे सामने सुरु होणार आहेत. आज गेलच्या बॅटमधूनही असेच कडक सिक्स बघायला मिळू शकतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.