Asia Cup 2023 | आशिया कपआधी टीमच्या अडचणीत वाढ, तगडा मॅचविनर प्लेअर स्पर्धेतून ‘आऊट’?
Asia Cup 2023 : आशिया कप 2023 तोंडावर आला असताना टीमच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. टीमचा मोठा प्लेअर स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई : आशिया कप 2023 तोंडावर आला असताना टीमच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. टीमचा मोठा प्लेअर स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. तीन दिवसांनी म्हणजेच 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 2 ऑगस्टला होणार आहे. मात्र मोठ्या स्पर्धेला सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना संघाच्या ओपनर खेळाडूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
कोण आहे तो खेळाडू?
आशिया सुरू होण्याआधी बांगलादेश संघाचा आक्रमक सलामीवीर लिटन दास आजारी पडला आहे. बांगलादेशचा लिटन दास हा स्टार खेळाडू असून अचानक त्याची तब्येत बिघडल्याने संघाची चिंता वाढली आहे. ओपनिंगला येत संघाला एक तगडी सुरूवात तो आपल्या बॅटींगने करूव देतो. लिटन दास आजारी असल्यामुळे रविवारी श्रीलंकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तो टीमसोबत बसू शकला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
लिटन दासची डेंग्यू चाचणी केली आहे ती जर नॉर्मल आली तर तो पुढील विमानाने श्रीलंकेला रवाना होईल. पण जर त्याची तब्येत आणखीन बिघडली तर त्याची जागी दुसऱ्या खेळाडूला रिप्लेस म्हणून पाठवलं जाईल, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संचालन समितीचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी दिली आहे. बांगलादेशचा पहिला सामना 31 ऑगस्टला श्रीलंकेसोबत होणार आहे.
आशिया कप 2023 साठी बांगलादेशचा संघ : मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शकीब अल हसन (C), लिटन दास, नजमुल हुसेन शांटो, तौहिद हृदोय, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शॉरीफुल इस्लाम, तन्झीद हसन, तनझिम हसन, नसुम अहमद, महेद हसन. , मोहम्मद नईम, शमीम हुसेन