IPL Final 2022 : गुजरात फायनलमध्ये गेली म्हणून मोदीही मॅच बघायला येणार? बंदोबस्तात वाढ

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी  एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे.

IPL Final 2022 : गुजरात फायनलमध्ये गेली म्हणून मोदीही मॅच बघायला येणार? बंदोबस्तात वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अअमित शाह देखील सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे. Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:18 AM

अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील विजेतेपद मिळवण्यासाठी आज सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत होणार आहे. आज दोन शेजारील राज्यांचे संघ इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरतील. पंधरा वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. तर दुसरीकडे दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलला नवा चॅम्पियन देण्याची संधी आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा सामना पाहण्यासाठी  एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरेल. दरम्यान, गुजरात फायनलमध्ये गेली म्हणून मोदीही मॅच बघायला येणार, अशीही चर्चा संध्या रंगली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील सामना पाहण्यासाठी येण्याची शक्यता आहे.

गुजरात फायनलला गेली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह फायनल पाहण्यासाठी जाणार असल्याची वेगळीच चर्चा देखील रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षा वाढवली

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. याठिकाणी 6 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मंत्र्यांसह सिनेसृष्टीतील दिग्ग्गज तारे आणि तारका देखील फायनलसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. येत्या काळात 17 डीसीपी, 4 डीआयजीएस, 28 एसीपी, 51 पोलीस निरीक्षक, 268 उपनिरीक्षक, 5 हजार हून अधिक कॉन्स्टेबल, 1 हजार होमगार्ड आणि एसआरपीच्या तीन कंपन्यांचा बंदोबस्त वाढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कोट्यवधींची बक्षिसे

राजस्थानच्या पराभवानंतर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवलंय. आयपीएल हंगामासाठी आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा होतील. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर पराभूत संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा ओबेड मेकॉय,

गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋदिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.