क्रिकेट मध्ये लास्ट बॉलवर SIX मारतात, तशी तेजस्वीन शंकरची CWG 2022 मध्ये कमाल, पहा VIDEO
CWG 2022: सध्या सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू कमालीच प्रदर्शन करतायत. देशाचं नाव उज्वल करतायत. आपल्या अंदाज, स्टाइल मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे तेजस्वीन शंकरसारखे कमीच असतात.
मुंबई: सध्या सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू कमालीच प्रदर्शन करतायत. देशाचं नाव उज्वल करतायत. आपल्या अंदाज, स्टाइल मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारे तेजस्वीन शंकरसारखे कमीच असतात. कॉमनवेल्थ गेम्सच्या हाय जम्प इवेंट मध्ये तेजस्वीन शंकरने देशासाठी ब्राँझ मेडल विजेती कामगिरी केली. ट्रॅक आणि फिल्ड इवेंट मध्ये CWG 2022 मध्ये देशासाठी मिळवलेलं हे पहिलं मेडल आहे. महत्त्वाचं म्हणजे हा तोच तेजस्वीन शंकर आहे, ज्याच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये उतरण्याबद्दल सस्पेन्स होता. आता त्याच खेळाडूने कांस्यपदक विजेती कामगिरी केलीय.
तेजस्विन शंकरचा मेडल जिंकण्यापर्यंतचा नाट्यमय प्रवास
तेजस्वीनच्या कॉमनवेल्थ प्रवेशाचा प्रश्न कोर्टात गेला होता. पहिल्या सुनावणीत नकार ऐकायला मिळाला. दुसऱ्या सुनावणीत निकाल तेजस्वीनच्या बाजूने आला. खेळाडूंचा कोटा वाढवून तेजस्वीनला पाठवण्याचे निर्देश दिले. पण याच दरम्यान एथलीट ओरोकिया राजीव फिटनेस टेस्ट मध्ये पास झाला नाही. त्यामुळे तेजस्वीनला संधी मिळाली.
तेजस्वीनला नशिबाची साथ मिळाली
पण अजून एक ट्वीस्ट बाकी होता. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनला तेजस्वीनचा प्रवेश मान्य नाही, असं AFI कडून सांगण्यात आलं. पण इथे सुद्धा तेजस्वीनला नशिबाची साथ मिळाली. भारताचे 2 एथलीट डोप टेस्ट मध्ये फेल झाले. त्यामुळे तेजस्वीनची निवड झाली. आता त्याच तेजस्वीनने भारतासाठी पदक विजेती कामगिरी केली आहे.
1st track and field medal this CWG for India ??
Tejaswin Shankar wins bronze medal ? in high jump with sensational jump of 2.22m!!!
Well done ? Many congratulations!!!
Hope many more to come ..#TejaswinShankar#HighJump#CommonwealthGames pic.twitter.com/ZQC4Rsu9I6
— Soug (@sbg1936) August 3, 2022
किती मीटर लांब उडी मारली?
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 202 मध्ये पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकून अॅथलेटिक्समध्ये भारताचं खातं उघडलं आहे . उंच उडीत भारताचा राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱ्या तेजस्वीननं अंतिम फेरीत 2.22 मीटरची सर्वोच्च उडी मारून या स्पर्धेत भारताचे पहिले राष्ट्रकुल क्रीडा पदक जिंकून इतिहास रचला. बुधवार 3 ऑगस्ट रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं मुख्य ठिकाण असलेल्या अलेक्झांडर स्टेडियमवर झालेल्या या उंच उडीच्या अंतिम फेरीत तेजस्वीननं 2.10 उंचीसह यशस्वी सुरुवात केली. त्यानं ते एकाच प्रयत्नात पार केलं. यानंतर तेजस्विननं प्रत्येकी एका प्रयत्नात 2.15, 2.19 आणि 2.22 मीटरचा पल्ला पार केला.