CWG 2022: आज पुन्हा वेटलिफ्टिंगपासून पदकांची सुरुवात, पंजाबच्या लवप्रीतने देशाचा गौरव वाढवला

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सचं कमालीच प्रदर्शन सुरु आहे. बुधवारी 109 किलो वजनी गटात लवप्रीत सिंहने दमदार कामगिरी केली.

CWG 2022: आज पुन्हा वेटलिफ्टिंगपासून पदकांची सुरुवात, पंजाबच्या लवप्रीतने देशाचा गौरव वाढवला
lovepreet singhImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 4:38 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सचं कमालीच प्रदर्शन सुरु आहे. बुधवारी 109 किलो वजनी गटात लवप्रीत सिंहने दमदार कामगिरी केली. लवप्रीतने 355 किलो वजन उचलून ब्राँझ मेडल मिळवलं. पंजाबचा राहाणारा लवप्रीत पहिल्यांदाच कॉमनवेल्थमध्ये सहभागी झाला आहे. डेब्यु मध्ये त्याने पदकाने खातं उघडलं. लवप्रीतने क्लीन अँड जर्कच्या शेवटच्या प्रयत्नात 192 किलो वजन उचललं. स्नॅच मध्ये 163 आणि क्लीन अँड जर्क मध्ये 192 किलो वजन उचललं. त्याचा एकूण स्कोर 355 किलो होता. त्याने कांस्यपदक विजेती कामगिरी केली. कॅमरुनच्या ज्यूनियर परसीसेल्क्सने 362 किलो वजनासह सुवर्णपदकाला गवसणी घातली. सामाओच्या वेटलिफ्टरने रौप्यपदक विजेती कामगिरी केली.

लवप्रीतला निलंबन झेलाव लागलय

लवप्रीत सिंहला आज पूर्ण देश सलाम करतोय. पण वर्ष 2019 मध्ये त्याने अशी वेळ सुद्धा पाहिली आहे, ज्याचा सामना करणं कुठल्याही एथलीटसाठी सोपं नाहीय. वर्ष 2019 मध्ये लवप्रीत विशाखपट्टनम येथे झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये डोपिंग मध्ये अडकला होता. त्यानंतर लवप्रीतला निलंबित करण्यात आलं होतं.

2021 मध्ये कमबॅक

वर्ष 2021 मध्ये या खेळाडूने पुनरागमन केलं. कॉमनवेल्थ सीनियर चॅम्पियनशिप मध्ये त्याने कमालीच प्रदर्शन केलं. थेट रौप्यपदक मिळवलं. उज्बेकिस्तानात झालेल्या या स्पर्धेत लवप्रीतने 348 किलो वजन उचलून सिलव्हर मेडल मिळवलं. ज्यूनियर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियनशिप मध्ये लवप्रीतने सुवर्णपदक मिळवलं.

सर्वाधिक 192 किलो वजन उचलण्यात यशस्वी

लवप्रीत सिंहने कॉमनवेल्थ गेम्सने पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिलीय. त्याने स्नॅच मध्ये 163 किलो वजन उचललं. क्लीन अँड जर्क मध्ये सर्वाधिक 192 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरला. त्याने एकूण 355 किलो वजन उचललं.

भारतीय नौदलात कार्यरत

लवप्रीत सिंह भारतीय नौदलात कार्यरत आहे. तो पंजाब अमृतसरचा राहणारा आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्याने मोठा कारनामा करुन दाखवला आहे. लवप्रीत कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपल्या इवेंट दरम्यान सिद्धू मुसेवाला सारख सेलिब्रेशन करताना दिसला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.