CWG 2022, CWG 2022 Athletics : अन्नूने नीरजची कमतरता भासू दिली नाही… भालाफेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवत कांस्यपदक
भारतीय महिला खेळाडू अन्नू राणीने (Annu Rani) राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवले. अन्नूने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक जिंकले.
नवी दिल्ली : भारतीय महिला खेळाडू अन्नू राणीने (Annu Rani) रविवारी राष्ट्रकुल (CWG 2022) क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले. अन्नूने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. अन्नू राणीने 60 मीटर फेक करून कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या केल्सी ली बार्बरनं 64.43 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले तर तिची देशबांधव मॅकेन्झी लिटिल 64.27 मीटर फेक करून द्वितीय आली. राणीच्या आधी राष्ट्रकुल चॅम्पियन काशिनाथ नायक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा यांनी पुरुषांच्या भालाफेकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि सुवर्णपदक जिंकले आहे. नायकने 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये तर चोप्राने 2018 च्या गोल्ड कोस्टमध्ये पदके जिंकली होती.
भालाफेकमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवत कांस्यपदक
What a day for our ?? athletes at the Alexander Stadium of @birminghamcg22 as Annu Rani wins a bronze medal in the women’s Javelin Throw final with a throw of 60m to join Eldhose Paul, Abdulla Aboobacker and Sandeep Kumar in the celebrations.
Photo- @WorldAthletics (Oregon22) pic.twitter.com/6ofIZjneXr
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2022
#CommonwealthGames2022 | India’s Annu Rani wins bronze in Women’s Javelin throw
(File Pic) pic.twitter.com/uljScbeyth
— ANI (@ANI) August 7, 2022
इतिहास रचला
स्पर्धा-2022 मध्ये इतिहास रचला. अन्नूने या खेळांमध्ये महिलांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले आणि अॅथलेटिक्समध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अन्नूने 60 मीटर अंतरावर भालाफेक करताना तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदके ऑस्ट्रेलियाच्या खात्यात राहिली. केल्सी ली बार्बरने सुवर्णपदक जिंकले, तर मॅकेन्झी लिटलने रौप्य पदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अन्नूने चौथ्या प्रयत्नात 60 मीटर भालाफेक केली. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे . अन्नूने यापूर्वी 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
शिल्पा राणी सातव्या क्रमांकावर
ऑस्ट्रेलियाच्या केल्सीने 64.43 मीटरसह सुवर्ण तर मॅकेन्झीने 64.27 मीटरसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत सहभागी होणारी अन्य भारतीय महिला धावपटू शिल्पा राणी सातव्या क्रमांकावर राहिली. शिल्पाने 54.62 मीटरचा प्रयत्न केला.
16 सुवर्णांसह एकूण 47 पदके
भारताकडे आता या खेळांमध्ये 16 सुवर्णांसह एकूण 47 पदके आहेत. त्याने 12 रौप्य आणि 19 कांस्यपदकेही जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया पदक-तालिकेत अव्वल स्थानावर आहे, त्याने आतापर्यंत 61 सुवर्णपदके जिंकली आहेत.