CWG 2022 Medal Tally: मेडल्स टेबलमध्ये जाणून घ्या भारत कितव्या स्थानी?
CWG 2022 Medal Tally: बर्मिंघन कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कालचा दिवसही भारतासाठी चांगला ठरला. गुरुवारी 4 ऑगस्टला सातव्यादिवशीही भारताच्या खात्यात पदकं जमा झाली.
मुंबई: बर्मिंघन कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये कालचा दिवसही भारतासाठी चांगला ठरला. गुरुवारी 4 ऑगस्टला सातव्यादिवशीही भारताच्या खात्यात पदकं जमा झाली. मागच्या काही दिवसाच्या तुलनेत फक्त दोन मेडल्स मिळाली. पण त्यांचा रंग चमकदार होता. सातव्या दिवसाच्या स्पर्धा संपण्याआधी भारताने एक गोल्ड आणि एक रौप्यपदक जिंकलं. भारताच्या मेडल्सची संख्या आता 20 झाली आहे. पण पदक तालिकेत भारत अजूनही 7 व्या स्थानावर आहे.
श्रीशंकर आणि सुधीरने रचला इतिहास
गुरुवारी भारताला एथलॅटिक्स आणि पावरलिफ्टिंग मधून चांगली बातमी मिळाली. सलग दुसऱ्यादिवशी एलेक्झेंडर स्टेडिमयमध्ये भारतीय जम्पर्सनी इतिहास रचला. बुधवारी तेजस्वीन शंकरने उंच उडीत ब्राँझ मेडल मिळवलं होतं. गुरुवारी मुरली श्रीशंकरने लांब उडीत रौप्यपदक मिळवलं. पुरुषांच्या लांब उडीत कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पदक जिंकणारा मुरली श्रीशंकर फक्त दुसरा आणि रौप्य मिळवणारा पहिला भारतीय एथलीट बनला आहे.
सुधीरने गेम्स मध्ये नवीन रेकॉर्ड बनवला
गुरुवारी पॅरा पावरलिफ्टिंगचा इवेंट सुरु झाला. त्यात पहिल्यांदा CWG गेम्स मध्ये पॅरा गेम्सचा समावेश करण्यात आला आहे. पॅरा पावरलिफ्टिंग मध्ये पहिल्यादिवशी बहुतांश इवेंट्स मध्ये समाधानकारक प्रदर्शन झालं नाही. पण शेवटच्या इवेंट मध्ये पुरुषांच्या हेवीवेट गटात भारताच्या सुधीरने गेम्स मध्ये नवीन रेकॉर्ड बनवत गोल्ड मेडल जिंकलं. कॉमनवेल्थच्या इतिहासात पॅरा पावरलिफ्टिंग मध्ये भारताला पहिल्यांदा गोल्ड मिळालं आहे.
बॉक्सर्सनी निश्चित केली मेडल्स
या दोन मेडल्ससह भारताची एकूण पदक संख्या 20 झाली आहे. यात 6 गोल्ड, 7 रौप्य आणि 7 ब्राँझ आहेत. मात्र तरीही भारत अजून सातव्या स्थानी आहे. भारताला आज 2 मेडल्स मिळाले आहेत. पण भारतीय बॉक्सर्सनी 4 मेडल्स निश्चित केले आहेत