CWG 2022: Table Tennis मध्ये अचंता शरतची कमाल, भारताला मिळवून दिलं दिवसातील तिसरं गोल्ड मेडल
भारताला आज दिवसातील तिसरं गोल्ड मेडल मिळालं आहे. अचंता शरत कमलने टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली.
मुंबई: बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सचा (CWG 2022) आज शेवटचा दिवस आहे. बॅडमिंटन पाठोपाठ टेबल टेनिस मधूनही एक चांगली बातमी आहे. अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरत कमलने (Achanta Sharath Kamal) पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. सोमवारी झालेल्या फायनल मध्ये त्याने यजमान इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डवर विजय मिळवला. अचंताने हा सामना 11-13, 11-7,11-2, 11-7 असा जिंकला.
अखेर पदकांचा रंग बदलला
अचंताने मागच्यावेळी गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीत कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. पण यंदा या 40 वर्षीय दिग्गज खेळाडूने पदकाचा रंग बदलण्याचा दृढ निश्चियच केला होता. फायनल मध्ये पोहोचून त्याने पदकाचा रंग बदलला.
?KAMAL KA KAMAAL?@sharathkamal1 ?wins against Liam (ENG) (4-1) (11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8) in the #TableTennis Men’s Singles event at the #CommonwealthGames2022
With this win, Sharath Kamal has bagged an overall 7? medals at the CWG in different categories? pic.twitter.com/OC3vBo47iS
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2022
एकतर्फी सामना
अचंताने सेमीफायनल मध्ये इंग्लंडच्याच पॉल ड्रिंकहॉलवर विजय मिळवून फायनल मध्ये प्रवेश केला होता. त्याच्या समोर आणखी एका इंग्रज खेळाडूचं आव्हान होतं. पिचफोर्ड अचंतासमोर आव्हान निर्माण करेल, अशी शक्यता होती. पण असं घडलं नाही. भारतीय दिग्गजाने एकतर्फी मॅच मध्ये विजय मिळवला. पिचफोर्ड अचंताला आव्हान देऊ शकला नाही. फक्त त्याने पहिला गेम जिंकला. तो गेम त्याने 13-11 असा जिंकला. अचंताने नंतरचे चार गेम जिंकून पदक मिळवलं.