कुस्तीपटूंच्या बळावर CWG 2022 मध्ये भारताची गरुड झेप, जाणून घ्या गुणतालिकेतील आकडेवारी
ऑस्ट्रेलियाने 50 सुवर्ण, 44 रौप्य आणि 46 कांस्यांसह 140 पदकांसह आकडेवारी अव्वल आहे. त्यांनी कामगिरी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली राहिली आहे.
मुंबई – काल राष्ट्रकुल स्पर्धेचा (CWG 2022) दिवस भारतासाठी अत्यंत चांगला होता. काल कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा (Indian Player) दबदबा पाहायला मिळाला आहे. काल राष्ट्रकुल स्पर्धेचा आठवा दिवस होता. काल दिवसभरात 6 पैलवानांनी देशाची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. कुस्तीपटूंनी भारताच्या खात्यात 3 सुवर्ण, एक रौप्य आणि 2 कांस्यपदके जमा केली आहेत. विशेष म्हणजे या पदकांच्या जोरावर भारत आता राष्ट्रकुल स्पर्धेच्या आकडेवारीतही वरच्या बाजूला आहे. गुणतालिकेमध्ये (Point Table) या आगोदर भारत सातव्या क्रमांकावर होता. परंतु काल झालेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारत आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. भारताकडे सध्या एकूण 26 पदक आहेत. भारताच्या खात्यात आतापर्यंत 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदके आहेत. काल कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
India overcome Scotland and South Africa in the Medal Standings after a terrific day in Wrestling. ????#CWG2022 #B2022 pic.twitter.com/Fs8wJtP4u3
हे सुद्धा वाचा— Sportskeeda (@Sportskeeda) August 5, 2022
आत्तापर्यंत कुस्तीत भारताला 6 पदके मिळाली आहेत
भारतीय कुस्ती खेळाडूंनी प्रत्येक गटात आपला दबदबा कायम ठेवला आहे. काल दिवसभराच चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. बजरंग पुनियाने ६५ किलो, साक्षी मलिकने ६२ किलो आणि दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात पदक पटकावले असल्याचे पाहायला मिळाले. अंशू मलिकने 57 किलोमध्ये रौप्य पदक पटकावले. दिव्या काकरनने 68 किलोमध्ये तर मोहित ग्रेवालने 125 किलोमध्ये कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत अजून इतर खेळ बाकी असल्यामुळे भारताला अजून पदक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला चांगली कामगिरी करता आली आहे.
गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया टॉप
ऑस्ट्रेलियाने 50 सुवर्ण, 44 रौप्य आणि 46 कांस्यांसह 140 पदकांसह आकडेवारी अव्वल आहे. त्यांनी कामगिरी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली राहिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड देश आहे. त्यांच्याकडे 47 सुवर्ण, 46 रौप्य, 38 कांस्य अशा एकूण 131 पदकं आहेत. कॅनडा हा देश 87 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड 41 पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. भारतानंतर स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, वेल्स आणि मलेशिया या संघाचा पहिल्या दहामध्ये समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडकडे 7 सुवर्णांसह एकूण 35 पदके, दक्षिण आफ्रिकेकडे 7 सुवर्णांसह 22, नायजेरियाकडे 7 सुवर्णांसह 16, वेल्सकडे 4 सुवर्णांसह 19 आणि मलेशियाकडे 4 सुवर्णांसह 11 पदके आहेत.