चंदीगड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संस्थासोबत ‘टायअप’,विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक स्तरावर करीअरच्या नवीन संधी!

क्रॉस कल्चरल एक्सपोजर ही विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात आणखी एक भर आहे. विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाच्या मार्गातूनच जागतिक व्यासपीठ उपलब्ध होत असून, या कारणानेच चंदीगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

चंदीगड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संस्थासोबत ‘टायअप',विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक स्तरावर करीअरच्या नवीन संधी!
चंदिगड विद्यापीठImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 5:24 PM

नवी दिल्ली: जागतिकीकरणामुळे, (Globalization) कोणत्याही शैक्षणिक संस्थांना आंतरराष्ट्रीय सहयोग घेणं सहज शक्य झाले आहे. या प्रक्रियेची नोंद घेऊन, चंदीगड विद्यापीठाने, (Chandigarh University) विविध देशातील शैक्षणिक संस्थासोबत टायअप केले आहे. या शैक्षणिक करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावर करिअरच्या नवीन संधी (career opportunities) उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास लक्षात घेऊन, चंदीगड विद्यापीठाने 383 हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्थासोबत टायअप केले आहे. या करारामुळे, शेकडो CU विद्यार्थी अभ्यासासाठी परदेशात गेले आणि 221 हून अधिक विद्यार्थ्यांची वॉल्ट डिस्ने येथे इंटर्नशिपसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना जागतिक एक्सपोजर आणि नवीन संधी मिळण्यास मदत होत आहे.

टायअप अंतर्गत घेण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम

• आंतरराष्ट्रीय उन्हाळी आणि हिवाळी कार्यक्रम • परदेशात सेमिस्टर/ एक्सचेंज प्रोग्राम्स • उच्च शिक्षण कार्यक्रम • ग्लोबल इमरर्शन प्रोग्राम्स • आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप

अशा विविध उपक्रमांद्वारे, विद्यार्थी आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे त्यांची कौशल्ये वाढवण्यास आणि विस्तृत करण्यास सक्षम बनत आहेत. ते स्वतःला अधिक विकसित करण्यास सक्षम असून, जागतिक व्यावसायिक जगाच्या गतिशीलतेबद्दल जागरूकता वाढवू शकतात आणि म्हणूनच त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्याची दृष्टी विकसीत होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय भेटींमधून शिकणे आणि आंतरराष्ट्रीय कार्यशाळा/सेमिनार/वर्गात उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना वेगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून जागतिक परिस्थिती अनुभवण्यास आणि समजून घेण्यास सक्षम करते. त्यांच्यामध्ये सहानुभूतीचा दर्जा विकसित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

हे सुद्धा वाचा

क्रॉस कल्चरल एक्सपोजर

क्रॉस कल्चरल एक्सपोजर ही विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात आणखी एक भर आहे. विद्यार्थ्यांना यामुळे शिक्षणाच्या मार्गातूनच जागतिक व्यासपीठ उपलब्ध होत असून, या कारणानेच चंदीगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. कारण विद्यापीठाच्या या जागतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कुठेही आणि कोणाशीही व्यवसाय यशस्वीपणे करण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे. ग्लोबल एक्सपोजरने चंदीगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवले असून, यामुळेच विद्यार्थांना त्यांचे नेतृत्वगुण आणि सांघीक कार्य सर्वात प्रभावी आणि कार्यक्षमतेने सादर करता येते. चंदीगड युनिव्हर्सिटी आपल्या जागतिक स्तरावरील सहकार्यांद्वारे स्पर्धात्मक संधी मिळावी याउद्देशाने, आपल्या विद्यार्थ्यांना जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये पाठवित आहे.

विद्यार्थ्यांच्या करीअरच्या संधी विस्तारल्या

जागतिकरणामुळे जग जवळ आलेले असतांना, भाषा, सीमा आणि संस्कृती यासारखे अडथळे वेगाने कमी होत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी करीअरच्या संधी विस्तारत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांनी पूर्वीपेक्षा अधिक तयारीपूर्ण आणि सुसज्ज असणे आवश्यक आहे आणि समोर येणाऱ्या प्रत्येक जागतिक संधीचा लाभ घेतला पाहीजे. त्यासाठी जागतिक मार्गाने शिक्षण आणि शिक्षणासाठी योग्य जागा ही विद्यार्थ्यासाठी उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी दोन महत्त्वाची साधने आहेत. चंदीगड विद्यापीठाने विदर्थ्यांचा आंतरराष्ट्रीय विकास होण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी टायअप केले आहेत. विद्यापीठाच्या या आंतरराष्ट्रीय करारामुळे, चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा होत आहे. या कराराअंतर्गत यूएसए, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडा मधील सर्वोच्च दर्जाची विद्यापीठे समाविष्ट असून, गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यांमध्ये महत्त्वपूर्ण मूल्यवर्धन केले आहे आणि त्यामुळे त्यांना नोकरी स्विकारतांना उत्कृष्ट पॅकेजेस मिळाले आहेत.

व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची संधी

सांस्कृतिक संदर्भ आणि जागतिक कारणास्तव, चंदिगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विविध देशांमधील व्यवसाय सेटिंग आणि पद्धतींबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची संधी दिली आहे. जेव्हा CU विद्यार्थी बहुराष्ट्रीय विद्याशाखेकडून शिकतात, तेव्हा त्यांना विविध संस्कृती आणि प्रदेशांमधील व्यवसाय पद्धतींचा एकंदर दृष्टीकोन विकसीत करण्याची संधी मिळते. त्यामुळे सीयू च्या विद्यार्थ्यांना परकीय बाजारपेठांमध्ये होत असलेल्या विविध व्यावसायिक धोरणांची माहिती मिळण्यास आणि त्यांच्या व्यवसाय सेटिंगमध्ये ते लागू करण्याबाबतची पद्धती शिकण्यास मदत करते.

व्हिडीओ पाहा:

चंदीगड विद्यापीठाने टायअप केलेली आंतरराष्ट्रीय विद्यापीठं

अमेरिका

उत्तर अलाबामा विद्यापीठ आर्कान्सा राज्य विद्यापीठ ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठ न्यूयॉर्क फिल्म अकादमी

युरोप

बाउमन मॉस्को स्टेट टेक्निकल युनिव्हर्सिटी पीटर द ग्रेट सेंट पीटर्सबर्ग पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटी कझान फेडरल स्टेट युनिव्हर्सिटी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ MISIS

यूके

मिडलसेक्स विद्यापीठ नॉर्थम्ब्रिया विद्यापीठ पूर्व लंडन विद्यापीठ ब्रुनेल विद्यापीठ

ऑस्ट्रेलिया

चार्ल्स स्टर्ट विद्यापीठ डीकिन विद्यापीठ कॅनबेरा विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ द सनशाईन कोस्ट

कॅनडा

कॉनकॉर्डिया विद्यापीठ, मॉन्ट्रियल रेजिना विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ ओंटारियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्हँकुव्हर फिल्म स्कूल

न्युझीलँड

मॅसी विद्यापीठ कॉर्नेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी ऑकलंड इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज तोई ओहोमाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

इस्रायल

तेल अवीव विद्यापीठ युनिव्हर्सिटी सेन्स मलेशिया

सिंगापूर

जेम्स कुक विद्यापीठ

तैवान

राष्ट्रीय यांग मिंग विद्यापीठ राष्ट्रीय केंद्रीय विद्यापीठ

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.