Chanakya Neeti: पत्नी, मुलगा आणि सच्चा मित्र… या तिघांची साथ असेल तर आणखी काय हवंय?; चाणक्यांनी दिलेला हा सल्ला वाचाच

आचार्य चाणक्य यांनी (Acharya Chanakya) यांनी अशा तीन लोकां बद्दल सांगितलं आहे. जे कोणत्याही लोकांबरोबर असले तर ते त्यांचा आधार बनतात.

Chanakya Neeti: पत्नी, मुलगा आणि सच्चा मित्र... या तिघांची साथ असेल तर आणखी काय हवंय?; चाणक्यांनी दिलेला हा सल्ला वाचाच
आचार्य चाणक्य
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 12:10 PM

आचार्य चाणक्य यांना आजच्या काळात लाईफ मॅनेजमेंट कोच (Life Management Coach ) मानलं जातं. आचार्य चाणक्य यांनी जीवनभर अनुभवाच्या आधारावर सर्व गोष्टी नीती शास्त्र नावाच्या ग्रंथात लिहली आहेत. नीती शास्त्राला चाणक्य नीती (Chanakya Neeti)  नावाने देखील ओळखलं जातं.जीवनात सुख (Happiness) आणि दुखं येतंच राहतं. सुख जेव्हा इतरांसोबत वाटलं जातं तेव्हा ते आधिक वाढतं. तसंच दुख जेव्हा इतरांसोबत वाटतो इतरांना सांगतो तेव्हा ते कमी होतं. पण, तुम्ही सुख सर्वां सोबत शेअर करू शकता. पण, दुखं किंवा त्रास तुम्ही प्रत्येक व्यक्तीला सांगू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी (Acharya Chanakya) यांनी अशा तीन लोकां बद्दल सांगितलं आहे. जे कोणत्याही लोकांबरोबर असले तर ते त्यांचा आधार बनतात. या तीन व्यक्तींवर पूर्ण विश्वास ठेवू शकता आणि त्यांच्या आधारे तुम्ही मोठ्यातील मोठ्यातील मोठं संकटं पार करू शकता. या तीन व्यक्ती आहेत पत्नी, मुलगा आणि एक खरा मित्र. जर तुम्हाला तुमच्या जीवनात यातीन व्यक्तींची साथ मिळत असेल तर तुम्ही स्वत:ला खूप भाग्यशाली मानलं पाहिजे.

आचार्य चाणक्य यांच्या मते ‘संसारातपदग्धानां त्रयो विश्रान्तिहेतव: अपत्यं च कलत्रं च सतां संगतिरेव च’ या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य सांगतात संसारिक तपातून जाताना लोकांना मुलं, पत्नी आणि सज्जनांची संगतच वाचवते. हे विस्ताराने समजून घेऊया.

मुलं

कोणत्याही आई वडीलांना त्यांच्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. जर मुलांना योग्य दिशा मिळाली, तर ते आई वडीलांच्या म्हातारपणाचा आधार असतात. ते त्यांच्या घराण्याचं नाव रोशन करतात. सदगुणी मुलं ही परिवाराची ताकद असतात. अशा मुलांच्या आधारे जीवनातील मोठ्यातील मोठं संकट पार केलं जाऊ शकतं.

हे सुद्धा वाचा

पत्नी

पत्नी सुशील आणि संस्कारी असेल तर ती तुमची चांगली मैत्रिण होऊ शकते. अशी पत्नी आपल्या पतीवर आलेल्या संकटाच्या काळात त्याची कायम साथ देते. साथच देत नाही तर आपल्या पतीला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. संकटकाळात पतीचं मनोबल वाढवते. संस्कारी पत्नी असल्याने परिवारचं नाही तर अनेक पिढ्याचं कल्याण होतं. कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात अशी पत्नी असेल. तर त्याला स्वत:ला भाग्यशाली मानलं पाहिजे.

खरा मित्र

मित्र जर खरा असेल तर तो तुम्हाला सुख दुखात साथ देईल. तुम्हाला चुकीच्या मार्गावरून जाण्यापासून वाचवतो. तुमच्या कठीण काळात तुम्हाला त्या परिस्थितीतून वाचविण्यासाठी मदत करतो. मार्गदर्शन करतो. असे मित्र खूप चांगलं निशिबाने मिळतात. जर तुमचे असे मित्र असतील, तर ते तुमची खूप मोठी संपत्ती आहे. त्यांच्यासोबत तुम्ही जीवनातील अनेक संकटांचा सामना सहज करू शकता.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.