Tulsi Plant Importance: …म्हणून रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये; धार्मिक कारण आणि मान्यता

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते (Tulsi Plant Importance) . तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशी असते, तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. ज्याच्या घरी तुळस राहते त्या घरावर विष्णूची कृपा सदैव राहते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून तुळशीला ओळखले जाते. सामान्य सर्दी आणि कफ  मुक्त होण्यास तुळशीची […]

Tulsi Plant Importance: ...म्हणून रविवारच्या दिवशी तुळस तोडू नये; धार्मिक कारण आणि मान्यता
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:00 AM

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते (Tulsi Plant Importance) . तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशी असते, तिथे लक्ष्मी असते अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. ज्याच्या घरी तुळस राहते त्या घरावर विष्णूची कृपा सदैव राहते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. नैसर्गिक अँटिबायोटिक म्हणून तुळशीला ओळखले जाते. सामान्य सर्दी आणि कफ  मुक्त होण्यास तुळशीची मदत होते. वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. घरच्या तुळशीला नियमित पाणी देणे आणि पूजेसाठी तुळशीचे पान तोडणे ही फार जुनी संस्कृती आहे. परंतु शास्त्रात याबद्दल काही नियम सांगितले आहे. काही विशिष्ट दिवशी तुळशीला पाणी घालणे किंवा तुळस तोडणे वर्ज मानण्यात आले आहे.  हे दिवस रविवार आणि एकादशी आहेत. या दिवशी तुळशीला पाणी देणे आणि तुळस तोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे (reason and beliefs not to cut tulsi on Sunday).

रविवारी तुळस का तोडू नये

हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती खूप शुभ मानली जाते. तुळशीला रोज पाणी घालणे आणि पूजेसाठी किंवा खाण्यासाठी तुळस तोडणे चांगले असते. मात्र रविवारी तुळस तोडणे आणि तिला पाणी घालणे व्यर्ज मानण्यात आले आहे. असे मानले जाते की, रविवारी तुळस ही भगवान विष्णूंसाठी उपवास करते. या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यास किंवा तिचे पाने तोडल्यास तिचा उपवास मोडतो . असे केल्याने नकारात्मकता पसरते. जीवनाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

हे सुद्धा वाचा

एकादशीला तुळशीला पाणी का घालू नये

असे मानले जाते की एकादशीला तुळशीचा विवाह विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार देवउठी एकादशीला दोघांनी रितीरिवाजानुसार लग्न केल्याची पुराणात माहिती आहे. एकादशीला तुळस उपवास ठेवते, असाही समज आहे. या त्यादिवशी तुळशीला जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते. त्यामुळे तुळस सुकायला लागतात.

घरामध्ये सुख-समृद्धीसाठी अशा प्रकारे लावा तुळशीचे रोप

  1. तुळशीचे रोप उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावणे शुभ मानले जाते.
  2. तुळशीच्या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळत असल्याची खात्री करा.
  3. तुळशीभोवतीची जागा नेहमी स्वच्छ असावी.
  4. तुळशीच्या रोपाजवळ कचरापेटी, बूट किंवा झाडू ठेवू नका.
  5. तुळस कॅक्टस किंवा काटेरी झाडांच्या जवळ ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैवीपणाला आकर्षित करेल.
  6. तुळशीचे रोप एक, तीन, पाच इत्यादी विषम संख्येत लावा.

    (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.