Shrawan Putrada Ekadashi 2023 : उद्या साजरी होणार श्रावण पुत्रदा एकादशी, मुहूर्त आणि नियम
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी (Shrawan Putrada Ekadashi 2023) म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे.
मुंबई : हिंदू धर्मात एकादशीचे व्रत फार महत्वाचे मानले जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी (Shrawan Putrada Ekadashi 2023) म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास इच्छुक दांपत्यास पुत्रप्राप्ती होते. वर्षातील प्रत्येक महिन्यात दोन एकादशी उत्सव साजरे केले जातात. एक शुक्ल पक्षाच्या तिथीला आणि दुसरी कृष्ण पक्षाला, पण पुत्रदा एकादशीचे महत्त्व अधिक मानले जाते. एकादशीची तिथी श्री हरी विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूचीही विधीनुसार पूजा केली जाते. ही एकादशी पुत्रप्राप्तीचे वरदान देणारीही मानली जाते.
मुलांशी संबंधित तक्रारी दूर होतात
हिंदू दिनदर्शिकेनुसार, पुत्रदा एकादशी हा सण सावन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला साजरा केला जातो. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. या दिवशी जगत्पती श्री हरी विष्णूची नियमानुसार पूजा केली जाते आणि ज्योतिष शास्त्राद्वारे काही उपाय केल्याने देखील पुत्रप्राप्ती होते.
मुहूर्त
श्रावण पुत्रदा एकादशी – 27 ऑगस्ट 2023, रविवार
एकादशी तारीख – 27 ऑगस्ट 2023, सकाळी 12.08 वा
एकादशी तिथी समाप्त – 27 ऑगस्ट 2023, रात्री 09.32 वा
विष्णूजी पूजा मुहूर्त – सकाळी 07.33 ते 10.46 पर्यंत
व्रत पारण – सकाळी 05.57 ते 08.31 (28 ऑगस्टपर्यंत)
द्वादशी तिथी समाप्त – 28 ऑगस्ट, 06.22 वा
सावन पुत्रदा एकादशी व्रताचे नियम
एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. यासोबतच दुपारी आणि रात्री जागरणही करावे. विष्णुजींच्या भक्तीत तल्लीन व्हा.
एकादशीच्या दिवशी मन शुद्ध ठेवावे. या दिवशी ब्रह्मचर्य पाळा.
या दिवशी कोणाशीही वाईट बोलू नका, वाईट विचार मनात आणू नका.
एकादशी व्रताच्या दिवशी भात खाऊ नये.
या दिवशी घरात फक्त सात्विक अन्न शिजवावे.
एकादशी व्रताच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी तुळशीमाता विष्णूजींसाठी निर्जल उपवास करते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)