Shrawan Putrada Ekadashi : रविवारी आहे श्रावण पुत्रदा एकादशी, या पाच राशीच्या लोकांचे भाग्य चकाकणार
हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत यावेळी 27 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी पाळले जाईल. दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक एकादशीचे व्रत शुक्ल पक्षात पाळले जाते, तर दुसरे एकादशीचे व्रत कृष्ण पक्षात पाळले जाते.
मुंबई : हिंदू धर्मात, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचा (Shrawan Putrada Ekadashi) उपवास केला जातो. हे व्रत नियमानुसार पाळल्यास इच्छुक व्यक्तीला संतान प्राप्ती होते आणि जीवनात प्रगती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुत्रदा एकादशीला भारतातील विविध राज्यांमध्ये पवित्रोपण किंवा पवित्र एकादशी असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत यावेळी 27 ऑगस्ट 2023 रोजी रविवारी पाळले जाईल. विशेष म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार दर महिन्याला 2 एकादशी असतात. एक एकादशीचे व्रत शुक्ल पक्षात पाळले जाते, तर दुसरे एकादशीचे व्रत कृष्ण पक्षात पाळले जाते. अशा प्रकारे वर्षभरात 24 एकादशी व्रत असतात, मात्र जेव्हा अधिक महिना असतो तेव्हा 26 एकादशी येतात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला पौराणिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे, कारण ही एकादशी संततीचे वरदान देणारी मानली जाते. हे व्रत केल्याने भगवान शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील
- मेष – धार्मिक प्रवासाला जाता येईल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. पती पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. मुलांच्या शेक्षणीक प्रगतीमुळे समाधानी राहाल.
- वृषभ – कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नोकरीमध्ये बदल लाभदायक ठरतील. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. महत्त्वाच्या लोकांशी गाठीभेटी होतील. व्यवसायात तेजी अनुभवाल. अडकलेला पैसा प्राप्त होईल. भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात शुभ कार्य होतील.
- सिंह- अचानक धनलाभ होईल. थांबलेले पैसे मिळतील. कोर्टाच्या प्रकणात निकाल तुमच्या बाजुने लागेल. वडिलोपार्जीत मालमत्तेतून लाभ संभवतो. जुन्या ओळखीतून लाभ होणार आहे. व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
- धनु – या काळात नशीबाची साथ मिळेल. जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करू शकता. कर्जाच्या फेऱ्यातून सुटका होईल. कुटूंबामध्ये सुरू असलेला तणाव चर्चा करून सुटेल.
- मीन- चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल. धार्मिक आणि सामाजीक कार्यात रूची वाढेल. मान सन्मानात वृद्धी होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)