Shrawan Purnima 2023 : पौर्णिमा तिथीला का केले जाते नदीत स्नान? असे आहे धार्मिक महत्त्व
यंदा श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होणार असून ती 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत चालेल. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा म्हणतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो.
मुंबई : हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तर पौर्णिमेच्या (Shrawan Purnima 2023) दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यंदा श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्टला सुरू होणार असून ती 31 ऑगस्टच्या सकाळपर्यंत चालेल. हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावणी पौर्णिमा म्हणतात. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सणही साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी किंवा रक्षासूत्र बांधतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण पौर्णिमेने हिंदी भाषीकांच्या श्रावण महिन्याचीही समाप्ती होणार आहे.
पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाचे महत्त्व
श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विविध तीर्थक्षेत्रांवर स्नान व दान करण्याची परंपरा आहे. कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवन आनंदी होते. मात्र तिर्थक्षेत्री जाणे तुमच्यासाठी शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे काही थेंब टाकून तुम्ही घरीच स्नान करू शकता आणि गरजूंना काही दान करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तर्पण किंवा पिंडदान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषही दूर होतो. यासोबतच सर्व प्रकारचे ग्रह दोषही दूर होतात.
श्रावण पौर्णिमा 2023 तारीख आणि शुभ वेळ
श्रावण महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात – 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:58 पासून श्रावण महिन्याची पौर्णिमा समाप्ती – 31 ऑगस्ट 2023 सकाळी 7.5 वाजता
पौर्णिमेच्या दिवशी हे प्रभावी उपाय अवश्य करा
- वैवाहिक जीवनात समस्या असल्यास या दिवशी पती-पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे. यामुळे त्यांच्या आयुष्यात येणारी प्रत्येक लहान-मोठी समस्या दूर होते. हा उपाय पती किंवा पत्नी दोघेही करू शकतात. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात शांती राहते.
- बऱ्याचदा अथक प्रयत्नानंतरही कामं पुर्ण होत नाही, तुमच्यासोबतही असे होत असल्यास या दिवशी विहिरीत चमच्याने दूध टाकावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने भाग्य उजळते. तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या कामात काही अडथळे येत असतील तर तेही या उपायाने दूर होतील.
- कुंडलीत काही ग्रहदोष असल्यास ते दूर करण्यासाठी या दिवशी पिंपळ आणि कडुनिंबाच्या झाडाखाली विष्णु सहस्त्रनाम किंवा शिवाष्टकांचे पठण करावे. यामुळे ग्रह दोष दूर होतात आणि शुभ परिणाम मिळू लागतात.
- ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या फोटोसमोर 11 रूपये ठेवावे आणि त्यावर हळदीचा टिळा लावावा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांला लाल कपड्यात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.
- पौर्णिमेच्या दिवशी पांढरे वस्त्र, साखर, तांदूळ, दही, चांदीच्या वस्तू आणि मोती दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)