Ganeshotsav 2022: कोणत्या बाजूला असावी गणपतीची सोंड, का आहे याला महत्त्व?
प्रत्येक गणपतीचे विशेष महत्त्व असते. गणपतीची सोंड एका बाजूला वळलेली असल्याने त्याला वक्रतुंडा देखील म्हणतात. श्रीगणेशाच्या वक्रतुंड स्वरूपामध्ये अनेक भेद आहेत. काही मूर्तींमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळताना दाखवली आहे.
काल घरोघरी गणपती (Ganpati) बाप्पांचे आगमन झाले. श्रीगणेश हे मांगल्याचे प्रतीक आहे. श्री गणेशाची मूर्ती विकत घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशाची मूर्ती (Ganesh Murti) विकत घेताना सर्वात आधी ती व्यवस्थित तपासून पाहावी. श्री गणेशाची सोंड (Ganpati Sond) कशी आहे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मूर्ती खरेदी करताना त्यांची सोंड कोणत्या दिशेला वळलेली आहे हे पाहावे. श्रीगणेशाच्या चित्रांमध्ये आणि मूर्तींमध्ये गणपतीची सोंड उजवीकडे किंवा काहींमध्ये डावीकडे असल्याचे तुम्ही पहिले असेल. सरळ सोंड असलेला गणेश कमी असतो. प्रत्येक गणपतीचे विशेष महत्त्व असते. गणपतीची सोंड एका बाजूला वळलेली असल्याने त्याला वक्रतुंडा देखील म्हणतात. श्रीगणेशाच्या वक्रतुंड स्वरूपामध्ये अनेक भेद आहेत. काही मूर्तींमध्ये गणेशाची सोंड डावीकडे वळताना दाखवली आहे. तर काही उजवीकडे वळताना दाखवले आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
उजव्या सोंडेचा गणपती
उजव्या सोंडेचा गणपती याचाच अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती होय. दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा दक्षिण दिशा. ही दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची असते. यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपतीमध्ये असते. त्याची सूर्यनाडी सुरु असल्याने तो तेजस्वीही असतो. असे सांगतात की दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप-पुण्याचा लेखाजोखा केला जाते. त्यामुळे ही बाजू नकोशी असते. महत्त्वाचे म्हणजे दक्षिणाभिमुख गणपतीची पूजा नेहमी केली जात नाही. तसेच, या गणपतीची पुजा करताना पूजाविधीचे सर्व नियम काटेकोर पाळणे आवश्यक असते. अभ्यासकांच्या मार्गदर्शनानेच या मूर्तीची उपासना करावी.
डाव्या सोंडेचा गणपती
डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते. वाम याचाच अर्थ डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डावी बाजू ही उचव्या बाजूच्या विरुद्ध दिशेस येते. डाव्या बाजूला चंद्रनाडी असते. ती शीतलता देते. उत्तर बाजू ही अध्यात्माला पूरक असते असे मानतात. त्यामुळेच वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य असते. या गणपतीची मात्र नियमीत पूजा केली जाते. डाव्या सोंडेच्या गणपतीसाठी कुठलेच विशेष नियम नसतात. त्यामुळे घरी गणपतीची प्रतिष्ठापना करीत असताना डाव्या सोंडेची मूर्ती आणावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)