Horoscope 2023: सप्टेंबर महिन्यात पाच ग्रहांच्या स्थितीत होणार उलथापालथ, या राशींची खुली होणार प्रगतीची दारं
September Horoscope : सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती बदलणार असून तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कोणत्या ग्रहाची कशी स्थिती असेल ते जाणून घेऊयात..
मुंबई: ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. सप्टेंबर महिन्यात पाच ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुरु ग्रह मेष राशीत वक्री होणार आहे. 4 सप्टेंबरला शुक्र कर्क राशीत मार्गस्थ होणार आहे. बुध ग्रह 16 सप्टेंबरला सिंह राशीत मार्गस्थ स्थितीत जाईल. 17 सप्टेंबरला सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. तर महिन्याच्या शेवटी मंगळ कन्या राशीत अस्ताला जाणार आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण तीन राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे.
तीन राशीच्या जातकांना होईल फायदा
मेष : सप्टेंबर महिन्यातील ग्रहांची स्थिती या राशीच्या जातकांना फायदेशीर ठरणार आहे. कारण या राशींवर गुरु-राहुची स्थिती आणि मंगळाची दृष्टी सकारात्मक परिणाम देणारी आहे. त्यामुळे या कालावधीत प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांचा गौरव होईल. तसेच प्रेम प्रकरमात यश मिळू शकते. वैवाहिक जीवनही आनंदात व्यतीत होईल. या कालावधीत रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
वृषभ : मेषनंतर या राशीच्या जातकांनाही सप्टेंबर महिना आनंदात जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. तसेच गुंतवणूक केलेल्या पैशातून चांगला परतावा मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत या कालावधीत निर्माण होतील. वाहन आणि प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. तसेच संतान संबंधित गोड बातमी कानावर पडू शकते.
तूळ : सप्टेंबर महिन्यातील ग्रहांची स्थिती गेल्या काही दिवसांपासून असलेली संभ्रमावस्था दूर करेल. जॉबच्या नवीन संधी चालून येतील. जॉब स्विच करण्यासाठी ही योग्य वेळ ठरेल. पण अपेक्षित पॅकेज मिळालं की नाही याची शहनिशा करूनच उडी घ्या. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत जवळच्या ठिकाणी फिरण्याचा योग जुळून येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)