Raksha Bandhan 2023: 700 वर्षानंतर रक्षाबंधन या दिवशी 5 महायोग! तीन राशींचं नशीब चमकणार

Raksha Bandha Mahayog : हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही घडामोड घडत असते. पण सणासुदीच्या दिवशी एखादा योग जुळून आला की त्याचा प्रभाव दिसून येतो.

Raksha Bandhan 2023: 700 वर्षानंतर रक्षाबंधन या दिवशी 5 महायोग! तीन राशींचं नशीब चमकणार
Raksha Bandhan 2023: 700 वर्षानंतर रक्षाबंधन या दिवशी घडतंय असं काही, तीन राशींना मिळणार पाठबळ
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:51 PM

मुंबई : श्रावण महिन्यातील पौर्णिमेला राखी पौर्णिमा असं संबोधलं जातं. या दिवशी चंद्रबळ सर्वाधिक असतं असं मानलं जातं. त्याचबरोबर रक्षाबंधनाचं वेगळंच असं महत्त्व आहे. असं असताना ग्रहांनी 700 वर्षानंतर पाच महायोग तयार केले आहेत. या योगामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळ भोगावे लागणार आहेत. या दिवशी बुधादित्य, शश, वासरपति, गजकेसरी आणि भ्रातवृद्धी असे योग जुळून येणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील काही राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे. अचानक धनलाभ किंवा प्रगतीचे योग तयार होणार आहे. चला जाणून घेऊयात राशीचक्रातील कोणत्या राशींवर प्रभाव पडेल ते…

या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ : या राशीच्या जातकांना पाच महायोगांचा जबरदस्त लाभ होणार आहे. काही अनपेक्षित घडामोडी घडतील. म्हणजेच तुम्ही ज्याचा कधी विचारच केला नाही अशा घटना घडतील. अर्थात या घडामोडी सकारात्मक असतील. अचानकपणे एखाद्या नातेवाईकांकडून पैशांची मदत होऊ शकते. कदाचित प्रॉपर्टीमधून काही भाग मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचं अपेक्षित फळ मिळू शकते. धार्मिक कार्यात भाग घ्याल. तसेच काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल. नोकरी शोधात असलेल्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते.

मकर : या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. पाच महायोगामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील वातावरण चांगलं राहील. सासरच्या मंडळीकडून तुम्हाला आर्थिक हातभार मिळेल. एखाद्या व्यवसायात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहान दिलं जाईल. नोकरी करणाऱ्यांना नवी जबाबदारी मिळू शकते. तुमच्या आत्मविश्वास या कालावधीत दुणावलेला राहील. त्यामुळे कामंही झटपट पूर्ण कराल. काही ज्योतिषिय उपाय आवश्यक वाटल्यास करा.

कुंभ : ग्रहांची स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. या कालावधीत नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. आतापर्यंत अवघड वाटत असलेलं कामंही पूर्ण कराल. काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. ओळखीचा फायदा भविष्यात होईल. नवीन उद्योग किंवा व्यवसाय या कालावधीत सुरु केला तर फलदायी ठरू शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि त्यानुसार जोखिम पत्कारा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.