कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे ‘जायंट किलर’, विद्यमान आमदाराकडून कसा खेचला विजय

शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कामाला सुरूवात केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक.

कोकणात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे 'जायंट किलर', विद्यमान आमदाराकडून कसा खेचला विजय
ज्ञानेश्वर म्हात्रे
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 3:01 PM

मुंबई : राज्यातील 5 विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचा (Vidhan Parishad Election Result) पहिला निकाल कोकणातून आला. कोकणात भाजपने (BJP) विद्यामान आमदार बाळाराम पाटील यांचा अनपेक्षितरित्या पराभव केला. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयामागे गेल्या सहा वर्षांत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतदार संघात बऱ्यापैकी पेरणी केली होती. मग त्याला भाजप आणि शिंदे गटाची साथ मिळाली. अन् सर्वांच्या प्रयत्नानंतर दणदणीत विजय मिळवत म्हात्रे निवडून आले.

कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11 हजार 300 मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे. बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तरीही पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा विजय झाला होता. त्यावेळी त्यांना 11 हजार 837 मते मिळाली होती.

ज्ञानेश्वर म्हात्रे होते दुसऱ्या क्रमांकावर

हे सुद्धा वाचा

कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजप प्रणीत शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोरनारे यांच्या नावाबाबत चर्चा होती. मात्र, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी गेल्या सहा वर्षात मतदार संघात सुक्ष्म नियोजन केले होते. यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास विजय सोपा होईल, हे भाजपने हेरले. मग बोरनारे यांचा पत्ता कट करून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवार बनवले. आतापर्यंत ही निवडणूक भाजप ऐवजी शिक्षक परिषदच लढत होती. 2017 मध्ये शिक्षक सेनेच्या माध्यमातून लढताना म्हात्रे यांना 6 हजार 887 मते मिळाली होती. तर बाळाराम पाटील यांनी 11 हजार 837 मते मिळवून विजय मिळवला.

कशी केली रणनिती

शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कामाला सुरूवात केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे बदलापुरातील शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक. मुळात त्यांची सर्व पार्श्वभूमी शिवसेनेची. त्यांचे बंधू वामन म्हात्रे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष होते. तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये संचालक. राजकीय पार्श्वभूमी, स्वत: चे वलय, भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेची साथ या सर्वांमुळे मोठे मताधिक्य घेत ते विजयी झाले.

शिंदे यांचा करिश्मा?

कोकण शिक्षक मतदार संघात एकूण 37 हजार मते. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सुमारे 15 हजार मते आहेत, तर पालघर जिल्ह्यात 6 हजार मते आहेत. रायगड जिल्ह्यात 10 हजार मते आहेत. या तीन जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्याचाी मोठा फायदा म्हात्रे यांना झाला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.