Pushkar Singh Dhami : चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा विजय, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Uttarakhand : ष्कर सिंग धामीने या विजयासह इतिहास रचला आहे. पुष्कर सिंग धामी यांनी उत्तराखंडमधील विधानसभा पोटनिवडणूक सर्वात मोठ्या फरकाने जिंकली आहे. यापूर्वी हा विक्रम माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या नावावर होता.

Pushkar Singh Dhami : चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा विजय, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा विजयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:14 PM

नवी दिल्ली – उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी अपेक्षेप्रमाणे चंपावत (Champavat) विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या निर्मला गहातोडी यांचा विक्रमी 54,121 मतांनी पराभव केला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. या विजयामुळे पुष्कर धामी यांनी आपली खुर्ची वाचवली आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपला सत्तेत आणणाऱ्या पुष्करने या विजयाने स्वत:ला ‘फायर’ असल्याचे सिद्ध केले आहे. 31 मे रोजी मतदान झाले होते. मतमोजणीच्या 13 टप्प्यांत पुष्कर सिंह धामी यांना एकूण 57268 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहातोडी यांना अवघ्या 3147 मते मिळाली आहेत. तसेच समाजवादी पार्टीचे उमेदवार मनोज कुमार यांना 409 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार हिमांशू गारकोटी यांना 399 तर नोटाला 372 मते मिळाली आहेत.

सर्वात मोठा विजय विक्रम

पुष्कर सिंग धामीने या विजयासह इतिहास रचला आहे. पुष्कर सिंग धामी यांनी उत्तराखंडमधील विधानसभा पोटनिवडणूक सर्वात मोठ्या फरकाने जिंकली आहे. यापूर्वी हा विक्रम माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या नावावर होता. त्यांनी 2012 च्या सितारांगज पोटनिवडणुकीत प्रकाश पंत यांचा 39,954 मतांनी पराभव केला होता. आज मोठ्या फरकाने विजय मिळविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तसेच त्यांनी योग्य काम केल्याने त्यांना मतं मिळाली आहेत. पुढचा विकास ते योग्य पद्धतीने करतील असं मोदी यांनी म्हटलं आहे.

पुष्कर सिंह धामी यांनी मानले लोकांचे आभार

पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा भाजपला सत्ता दिल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी 23 मार्चला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सहा महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं. चंपावत मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे कैलास गहातोडी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जागा सोडली होती. काँग्रेसने निर्मला गेहतोडी यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे केले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा मोठा विजय सुनिश्चित करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांनी प्रचारात पूर्ण ताकद पणाला लावली होती. याशिवाय चार आमदार दुर्गम भागात 15 दिवस राहिले होते.

विशेष म्हणजे धामी यांनी स्वतः येथे अनेकदा प्रचार केला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्यासाठी रॅली काढली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.