UMC Election 2022, Ward No 16 : मतदार ठरवतील तोच नगरसेवक; प्रभाग क्रमांक 16 मध्ये काय घडतंय?
UMC Election 2022, Ward No 16 : ओबीसी आणि महिलांना वगळून या प्रभागात इतरांना एकप्रकारची नो एन्ट्री असणार आहे. त्यामुळे या प्रभागातील आजी-माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून निवडणूक लढावी लागणार आहे.
उल्हासनगर: महापालिका निवडणुकांचं पडघम वाजलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबई (mumbai) महापालिकेचं रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच्या सर्व 14 महापालिकांमध्ये प्रचाराची लगबग सुरू झाली आहे. पावसाळाही संपत आला आहे. शिवाय सण उत्सवाचे दिवस असल्याने या सण उत्सवांच्या माध्यमातून आजीमाजी नगरसेवकांस इच्छुकांनीही स्वत:ची, पत्नी, मुलगी आणि सुनेची मार्केटिंग करणं सुरू केलं आहे. सण-उत्सवाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल, यावर त्यांनी भर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक मंडळांसोबतच्या बैठकाही वाढल्या आहेत. त्यामुळे निवडणुका असलेल्या सर्वच महापालिका क्षेत्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. उल्हासनगर महापालिकाही (ulhasnagar corporation) त्याला उपवाद नाहीये.
अनेकांचा हिरमोड
प्रभाग क्रमांक 16 मध्ये यंदा दोनच वॉर्ड आहेत. एक अ आणि दुसरा ब. अ वॉर्डात ओबीसी आरक्षण पडलं आहे. तर ब हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे अनेकांची गोची झाली आहे. ओबीसी आणि महिलांना वगळून या प्रभागात इतरांना एकप्रकारची नो एन्ट्री असणार आहे. त्यामुळे या प्रभागातील आजी-माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून निवडणूक लढावी लागणार आहे. तर महिला वॉर्ड राखीव झाल्याने या वॉर्डातून पत्नी, मुलगी आणि सून यांना निवडणुकीसाठी उभे करण्याकरिता अनेकांचे प्रयत्न सुरू झाला आहे. तसेच अ हा वॉर्ड ओबीसींसाठी राखीव झाल्याने ओबीसींमध्येही आता तिकीटासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
प्रभाग अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
मतदार संघाची व्याप्ती
या प्रभागात समर्पण अपार्टमेंट, सेक्शन 17 परिसर, शिवाजी चौक परिसर, लासी सायकल मागील माता मंदिर परिसर, शिल्पा अपार्टमेंट, संतोष अपार्टमेंट, सीमा अपार्टमेंट, वालधुनी नाला, सागर अपार्टमेंट, धोबी घाट, काली माता परिसर, एकता नगर परिसर, प्रांत ऑफिसर परिसर आणि पवई शिवधाम परिसर येतात.
प्रभाग ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
मतदार ठरवतील तो नगरसेवक
या मतदारसंघात एकूण 12 हजार 399 मतदार आहेत. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार २९८ मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे 41 मतदार आहेत.