TMC Election 2022, Ward 46 : राज्यातील सत्तांतरानंतर ठाणे महापालिकेकडे राज्याचं लक्ष, एकनाथ शिंदे गट बाजी मारणार की ठाकरे गट शिंदेंना हादरा देणार?
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे बंडखोरांना धडा शिकवण्याच्या मानसिकतेत असल्यामुळे ते ही ठाण्यात अधिक जोर लावताना दिसतील.
ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातील महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार पायउतार झालं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार गेले. तसंच ठाणे आणि मुंबईसह राज्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि लोकप्रतिनिधीही गेले. त्यामुळे शिवसेना दुभंगल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. अशावेळी आगामी महापालिका निवडणुकांवर (Municipal Corporation Election) या सत्तांतराचा परिणाम पाहायला मिळणार हे नक्की. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे बंडखोरांना धडा शिकवण्याच्या मानसिकतेत असल्यामुळे ते ही ठाण्यात अधिक जोर लावताना दिसतील. तशी तयारीही त्यांनी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी ठाणे महापालिकेत शिंदे गट आणि भाजप एकत्रितपणे बाजी मारणार? ठाकरे शिंदेंना शह देत महापालिका ताब्यात घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ठाणे महापालिकेविषयी जाणून घेऊया
ठाणे महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 1982 रोजी झाली. 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 26 हजार 3, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42 हजार 698 इतकी आहे. ठाणे महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ 147 चौरस किलोमीटर इतकं आहे. ठाणे महापालिकेची भौगोलिक स्थिती पाहिली तर एका बाजूला खाडी, दुसऱ्या बाजूला डोंगराळ प्रदेश आहे. समुद्र सपाटीपासून ठाणे शहराची उंची 7 मीटर इतकी आहे.
प्रभाग क्रमांक 46 ची लोकसंख्या :
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 46 ची एकूण लोकसंख्या 42 हजार 623 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 हजार 111, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 806 इतकी आहे.
प्रभाग क्र. 46 चे आरक्षण (महाविकास आघाडी सरकारनुसार) :
महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना आता शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारने रद्द केलीय. त्यामुळे प्रभागातील आरक्षणही रद्द झालेय. असं असलं तरी आधीच्या सरकारने काढलेल्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 46 मधील वार्ड क्र 46 (अ) नागरिकांचा मागासवर्क प्रवर्ग महिला, वार्ड क्र 46 (ब) सर्वसाधारण महिला, तर वार्ड क्र 46 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होता.
प्रभाग क्र. 46 ची व्याप्ती :
देसाई, डायघर (भाग), साबे (भाग), शिळ (भाग), डावले, पडले, सोनखार, डोमखार, सागर्ली, खिडकाळी, कौसा तलाव परिसर
उत्तर : मुंबई पुणे रोड पासून कादर पॅलेस शोपिंग सेंटरच्या बाजूच्या रस्त्याने नवसीन कॉम्प्लेक्स पर्यंत आणि त्यानंतर तन्वर बाग मागून डॅनियल मंजीलपर्यंत आणि त्यानंतर लेनने खुशनुमा अपार्टमेंट पर्यंत आणि त्यानंतर उत्तरेकडे रस्त्याने निशाद इमारतीपर्यंत आणि त्यानंतर निशाद इमारतीपासून पूर्वेकडे हेवन हाईटपर्यत तद्नंतर दक्षिणेकडे लेनने पलाह कॉम्प्लेक्स कंपाऊंड पर्यंत आणि त्यानंतर कंपाऊंड वॉलने दिक्षणेकडेयापर्यंत आणि त्यानंतर पश्चिमेकडे बी एस यू पी नाल्याने सोनखार हद्दीपर्यंत आणि त्यानंतर सोनखार हद्दीने देसाई खाडीपर्यंत आणि त्यानंतर देसाई खाडीने पूर्वेकडे ठामपा हद्दीपर्यंत
पूर्व : देसाई खाडी व ठाणे महानगरपालिका हद्द
दक्षिण : खिडकाळी गावाच्या हद्दीपासून ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीने मुंबई-पुणे रस्त्यापर्यंत..
पश्चिम : टीएमसी हद्दीपासून उत्तरेकडे मुंबई-पुणे रस्त्याने महाराष्ट्र ग्लासच्या गोडाऊनसमोरील गल्लीपर्यंत, त्यानंतर उत्तरेकडे टॉवर लाईनने सुनील चाळीपर्यंत, त्यानंतर पश्चिमेकडे नाल्याने मुंबई-पुणे रस्त्यापर्यंत, त्यानंतर मुंबई-पुणे रस्त्याने उत्तरेकडे कल्याण फाटा ते शिळफाटा ते कादर पॅलेस शोपिंग सेंटरपर्यंत.
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |