Suresh Kalmadi : माजी खासदार सुरेश कलमाडी तब्बल 10 वर्षांची पुणे महापालिकेत, ओळखणंही झालं कठीण!

कलमाडी तब्बल एका दशकानंतर पुणे महापालिकेत आले. एकेकाळी राजकारणात दरारा असलेल्या कलमाडींना आज ओळखणही अवघड झालं होतं. पण कलमाडी पालिकेत आल्याची बातमी पसरताच महापालिकेत कलमाडी काळाच्या चर्चा रंगल्या.

Suresh Kalmadi : माजी खासदार सुरेश कलमाडी तब्बल 10 वर्षांची पुणे महापालिकेत, ओळखणंही झालं कठीण!
सुरेश कलमाडी, माजी खासदारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:57 PM

पुणे : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) तब्बल 10 वर्षांनी पुणे महापालिकेत आले. पुणे फेस्टिव्हलच्या काही परवानग्या घेण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. दरम्यान, ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ ही काही दशकांपूर्वी पुण्याची ओळख होती. पुण्यातील राजकारण (Pune Politics) असो, खेळ असो की मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, हे सगळं सुरेश कलमाडी या व्यक्तीभोवती फिरत होत. कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजेच कलमाडी असा तो काळ होता. पूर्ण देशाचं राजकारण कलमाडी यांच्याभोवती फिरत होत. पण कॉमनवेल्थ स्पर्धेतील (Commonwealth Games) घोटाळ्यानंतर सुरेश कलमाडी हे नाव पुण्याच्या राजकीय पटलावरून पुसलं गेलं. आज तेच कलमाडी तब्बल एका दशकानंतर पुणे महापालिकेत आले. एकेकाळी राजकारणात दरारा असलेल्या कलमाडींना आज ओळखणही अवघड झालं होतं. पण कलमाडी पालिकेत आल्याची बातमी पसरताच महापालिकेत कलमाडी काळाच्या चर्चा रंगल्या.

कलमाडींच्या राजकारणाची सुरुवात

फर्ग्युसन महाविद्यालयात शिकलेल्या सुरेश कलमाडी यांनी 1964 ते 1972 या काळात भारतीय वायू दलात पायलट म्हणून काम केलं. 1974 ला वायुदलातून निवृत्त घेतली अन 1977 ला इंडियन युथ काँग्रेसचे ते पुण्यातील अध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1980 पर्यत ते युथ काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून कधी पाहिलेच नाही. पण कॉमनवेल्थ स्पर्धेतला घोटाळा बाहेर आल्यावर खेळात राजकारण आणणाऱ्या ‘सबके बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ यांचा गेम ओव्हर झाला.

कलमाडी आणि क्रीडा स्पर्धा

  1. 1978 ला पुणे रिजन अथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष
  2. 1982 मध्ये बीजी मॅरेथॉन साठी संघ व्यवस्थापक
  3. 1983 पासून पुण्यात कलमाडींनी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू केली
  4. 1994 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रीय स्पर्धेचे पुण्यात आयोजन
  5. 1996 ते 2011 मध्ये भारतीय ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष
  6. 2003 मध्ये आफ्रो आशियाई गेम्सचं आयोजन
  7. 2008 मध्ये पुण्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन
  8. गणेशोत्सव काळात पुणे फेस्टिव्हलचे आयोजन

राजकारण करत असतानाच कलमाडींनी खेळाचा राजकारणासाठी अचूक उपयोग होऊ शकतो हे हेरलं आणि राजकारणासाठी खेळाच्या ट्रॅकचा यशस्वी उपयोग केला. तब्बल 30 वर्ष कलमाडीचं या दोन्हीवर वर्चस्व होतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

1996 मध्ये पहिल्यांना पुण्यातून खासदार

1996 मध्ये कलमाडींनी पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवत विजय प्राप्त केला होता. नंतर, 2004 मध्येही त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली होती, त्यांनी त्या संधीचे सोने करून दाखवले. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सरकारमध्ये सुरेश कलमाडी यांच्याकडे रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते.

राष्ट्रकूल स्पर्धेतील घोटाळा आणि कलमाडींच्या राजकाणाला उतरती कळा

2011च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता. कारण ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. यासोबतच 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर केला जात आहे. हे प्रकरण प्रचंड गाजले, या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. चौकशीअंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयने कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. 26 एप्रिल 2011 ला त्यांना इतरही अनेक संघटनांच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास दहा महिने कारावासात होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. पुढे कलमाडी कुठल्याच सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत.

मात्र, आज जवळपास 10 वर्षानंतर कलमाडी पुणे महापालिकेत आले. हातात काठी टेकवत आलेल्या कलमाडींना अनेकांनी पटकन ओळखलही नाही. पण कलमाडी महापालिकेत आलेत ही बातमी पसरताच अनेकांना कलमाडींचा काळ आठवला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.