Tv9 Marathi Special Report : राज्यसभेतून माघार, आता संभाजीराजेंची राजकीय भूमिका काय? रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात घोषणेची शक्यता

राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही आरोप केले. त्यानंतर संभाजीराजेंनी ट्वीट करत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चलो रायगड म्हणत जनतेला निमंत्रण दिलं आहे. आता संभाजीराजे दुर्गराज रायगडावरुन कोणती राजकीय भूमिका जाहीर करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Tv9 Marathi Special Report : राज्यसभेतून माघार, आता संभाजीराजेंची राजकीय भूमिका काय? रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात घोषणेची शक्यता
संभाजीराजे छत्रपतीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:03 AM

मुंबई : मराठा आंदोलनाचं नेतृत्व केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chhatrapati) यांचं नेतृत्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलं. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन त्यांनी वेळोवेळी कठोर पण सकारात्मक भूमिका मांडली. वेळप्रसंगी सरकारला खडे बोल सुनावले. बहुजनांसह सर्वसामान्य मराठा तरुणाला न्याय मिळावा यासाठी संभाजीराजे झटताना पाहायला मिळाले. त्यामुळेच त्यांना मानणारा एक स्वतंत्र वर्ग राज्यात तयार झाला. अनेक मराठा संघटना त्यांच्याशी जोडल्या गेल्या. असे संभाजीराजे छत्रपती या आठवड्याभरात काहीसे बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागल्यानंतर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर काही आरोप केले. त्यानंतर संभाजीराजेंनी ट्वीट करत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चलो रायगड म्हणत जनतेला निमंत्रण दिलं आहे. आता संभाजीराजे दुर्गराज रायगडावरुन कोणती राजकीय भूमिका जाहीर करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक लागल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. सर्व राजकीय पक्षांना त्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. त्याचवेळी त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापनाही केली. दरम्यान, संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची काँग्रेसची शिल्लक राहणारी मतं संभाजीराजेंना देऊ अशी घोषणा केली. मात्र, शिवसेनेनं आपला दुसरा उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली आणि आमची मतं शिवसेनेच्याच उमेदवाराला असतील मग तो उमेदवार कुणीही असो, असं पवारांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेनं संभाजीराजेंची कोंडी केली?

संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिवसेना दुसरा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. त्यामुळे संभाजीराजे यांची कोंडी होणार असं चित्र निर्माण झालं. मात्र, त्यावेळी शिवसेनेकडून संभाजीराजेंना विधान परिषद उमेदवारीची ऑफर देण्यात आली. मात्र, त्यासाठी शिवबंधन हाती बांधण्याची अट घालण्यात आली. संभाजीराजे छत्रपती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य शिवसेना नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या. संभाजीराजे यांनी आपल्याला शिवसेना पुरस्कृत उमेदवार करा, अशी गळ घातली. मात्र, शिवसेना त्यासाठी तयार झाली नाही. शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आलं. त्यावेळी मावळ्यांमुळेच राजे असतात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी संभाजीराजेंना नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही – संभाजीराजे

अखेर शिवसेनेनं दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर संभाजीराजेंना राज्यसभेवर जाण्यासाठी लागण्याऱ्या 42 आमदारांची जुळवाजुळव शक्य नसल्याचं जाणवलं. त्यामुळे संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं 27 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. त्यावेळी मी राज्यसभा लढवत नसलो तरी ही माघार नाही. हा माझा स्वाभीमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको, असं संभाजीराजे म्हणाले. इतकंच नाही तर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा गंभीर आरोपही केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत विचारणा केली. पण मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही. ज्या शिवसेना आमदार आणि मंत्र्यांसोबत माझ्या बैठका झाल्या, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. मुख्ममंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

पुढची दिशा स्वराज्य बांधणी

राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली पुढील दिशा काय असणार हे देखील स्पष्ट केलं होतं. राज्याचा दौरा करुन महाराष्ट्रभरातील मावळ्यांची बांधणी करणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा करताना संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटनेचीही घोषणा केली होती. स्वराज्याच्या नावाखाली लोकांना एकत्र करण्यासाठी राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचंय…

राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्याबाबतची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 26 मे रोजी संभाजीराजे यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर संभाजीराजे नतमस्तक झालेला फोटो संभाजीराजे यांनी ट्विट केला. त्यावेळी ‘महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ असं संभाजीराजे म्हणाले होते. त्यामुळे संभाजीराजे यांनी एकप्रकारे महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिल्याची चर्चा रंगली होती.

रायगडावरून काय घोषणा करणार?

आज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यासाठीची कार्यक्रम पत्रिकाही संभाजीराजे यांनी ट्विट केलीय. मात्र, राज्यसभा निवडणुकीतून घ्यावी लागलेली माघार, स्वराज्य संघटनेची केलेली स्थापना या पार्श्वभूमीवर संभाजीराजे दुर्गराज रायगडावरुन पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? आपल्या मावळ्यांना ते कोणता आदेश देणार? हे पाहणं महत्वाचं ठणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.