Saamana : ‘काळ मोठा कठीण, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल’ शिवसेनेला विश्वास

शिं‍दे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्र्याप्रमाणेच विधानसभेत अध्यक्ष राहुल कर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत.

Saamana : 'काळ मोठा कठीण, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल' शिवसेनेला विश्वास
'काळ मोठा कठीण, पण हा काळाकुट्ट काळही निघून जाईल' शिवसेनेला विश्वासImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:41 AM

मुंबई – “घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच दुटप्पीपणे वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगोमे आत आणून विधिमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. महाराष्ट्रात (Maharashtra) असे वर्तन व राजकारण कधीच घडले नव्हते. शिवरायांच्या साक्षीने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Tackeray) यांच्या शपथा घेऊन हे पाप कोणी करत असेल तर भारतमाता त्यांना माफ करणार नाही. आता प्रश्न राहिलाय गेल्या अडीच वर्षापासून प्रलंबित असलेल्या 12 नामनियुक्त विधान परिषद सदस्यांचा. आता नवे सरकार आले आहे. त्यामुळे या फाईलच्या जागी नवी फाईल आणून ती राज्यपालांच्या सहीने मंजूर होईल व पेढे भरवण्याचा कार्यक्रम पुनः पुन्य होत राहील काळ मोठा कठीण आला आहे हे खरे, पण हा काळाकुट्ट काळी निघून जाईल!” सामाना (Saamana) अग्रलेखातून भाजपवरती जोरदार टीका केली आहे.

काळ कठीण, पण जाईल!

शिं‍दे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्र्याप्रमाणेच विधानसभेत अध्यक्ष राहुल कर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा प्रवास करीत ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंत आहे. शिंदे गटाने बंड केल्यापासून सामना अग्रलेखातून भाजपवरती अनेक थेट निशाना साधला गेलाय. त्याचबरोबर काल राजकीय घडामोडीवरती सामनाच्या अग्रलेखातून पु्न्हा टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

मी आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्री झालो, पण राज्यपालांनी एकदाही पेढा भरवला नाही

“ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना त्याच आनंदाच्या भरात राज्यपालांनी पेढा भरवून आनंद व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना देखील हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील दुकाने बंद पडली असावीत. शरद पवार म्हणतात ते विधान गमतीचे असले तरी खरेच आहे. मी आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्री झालो, पण राज्यपालांनी एकदाही पेढा भरवला नाही, असे शरद पवार म्हणाले ते बरोबरच आहे. कारण राज्यपाल हा तटस्थ व घटनेचा रखवालदार असतो. मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचा आला-गेला तरी त्यांना फरक पडत नाही, पण गेल्या दोन-चार वर्षांत महाराष्ट्रातील राजभवनात वेगळेच चित्र दिसत आहे”

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.