Rajya Sabha Election 2022: काय होती अहमद पटेल केस? जिच्या आधारावर भाजपानं मविआचे तीन मतं बाद करण्याची मागणी केलीय, अमित शहांना बसला होता झटका

Rajya Sabha Election : 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, त्याच धर्तीवर भाजपकडून मविआची मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Rajya Sabha Election 2022: काय होती अहमद पटेल केस? जिच्या आधारावर भाजपानं मविआचे तीन मतं बाद करण्याची मागणी केलीय, अमित शहांना बसला होता झटका
अमित शाह, अहमद पटेल (फाईल फोटो)Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 7:05 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आज मतदान पार पडलं. मात्र, 5 वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. कारण, भाजपकडून महाविकास आघाडीच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार भाजपकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला (Central Election Commission) पत्र लिहिण्यात आलंय. त्यामुळे राज्यसभेची मतमोजणी अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. अशावेळी 2017 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या केसमध्ये नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. कारण, त्याच धर्तीवर भाजपकडून मविआची मतं बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपकडून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे यांनी स्वत:च्या पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीशिवाय व्यक्तींना त्यांची मतपत्रिका दाखवून मतदानाच्या प्रक्रिया पाळली नाही, अशी तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे. तसंच 2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात निवडणूक आयोगाने निवडणूक नियमांचे उल्लंघन करुन टाकलेले कोणतंही मत मतदानाच्या किंवा मतमोजणीच्या वेळी रद्द केले जाईल, अशी अट घातली होती. त्यामुळे अहमद पटेल 2017 मध्या कशाप्रकारे विजयी ठरले हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

2017 मध्ये अहमद पटेल प्रकरणात काय घडलं होतं?

2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आसपास राज्यसभा निवडणूक झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शाह हे केंद्रीय राजकारणात गेल्यानंतर तिथे पहिलीच निवडणूक होत होती. त्यामुळे संपूर्ण देशाचे डोळे या निवडणुकीकडे लागले होते. राज्यसभेच्या तीन जागांवर गुजरातमध्ये निवडणूक पार पडली होती. ज्यात दोन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. तर एका जागेबाबत अनिश्चितता होती. तिसऱ्या जागेवर काँग्रेसचे नेते अहमद पटेल उमेदवार होते. तर भाजपकडून त्यांच्यासमोर एक उमेदवार उभा करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

भाजपकडून अहमद पटेल यांच्या विरोधात काँग्रेसमधूनच आलेले बलवंत राजपूत यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे 45 मतांची ही लढाई अधिक रंजक बनली होती. मात्र, निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी राजीनामा दिला होता आणि नेमकी हीच बाब काँग्रेससाठी चिंतेचा विषय बनला होता. अशास्थितीत अहमद पटेल यांना मात देण्यासाठी भाजपनं रणनिती आखली होती. स्वत: अमित शाह यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं.

निवडणूक आयोगाकडून विशेषाधिकाराचा वापर

मतदान पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते अर्ध्या रात्री निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केल्यानंतर बूथबाहेर उभ्या असलेल्या अमित शाह यांना व्हिक्ट्री साईन दाखवलं, असा आक्षेप काँग्रेसनं घेतला होता. त्यामुळे त्यांचं मत रद्द करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत काँग्रेस आणि भाजपचे नेते निवडणुकीत आयोगाकडे चकरा मारत होते. अखेर रात्री 12 नंतर निवडणूक आयोगाने आपला अंतिम निकाल जाहीर केला. आयोगाने आपल्या संवैधानिक अधिकारांचा वापर करत रिटर्निंग ऑफिरसरचा मतं वैध ठरवण्याचा निर्णय रद्द केला. आयोगाने संविधानाच्या कलम 324 वर भर दिला. हे कलम आयोगाला निवडणूक प्रक्रियेचं संचलन करणाऱ्या लोकप्रतिनिधी कायद्यात समावेश नसलेल्या परिस्थितीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्याचा अधिकार देतं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.