‘मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!’ अशोक गेहलोत म्हणतात, ‘राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं’

Ashok Gehlot on Rahul Gandhi : सोनिया गांधी याच्याऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जावं, अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यातच अशोक गेहलो यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नावाचा पुनरुच्चार केलाय.

'मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!' अशोक गेहलोत म्हणतात, 'राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं'
काँग्रेस अध्यक्षपदावरुन पुन्हा नव्या चर्चांना उधाणImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 5:10 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह देशाच्या पाच राज्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता गांधी परिवारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi) याच्याऐवजी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पूर्णवेळ काँग्रेसचं अध्यक्षपद (Congress President) दिलं जावं, अशी कुजबूज सुरु झाली आहे. त्यातच अशोक गेहलो यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाचा पुनरुच्चार केलाय. राहुल गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्त्व करायला हवं, असं मत अशोक गेहलोत यांनी व्यक्त केलंय. पाचही राज्यात काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर दुसरीकडे भाजपनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे काँग्रेसवर पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. अशातच काँग्रेसचे वरीष्ठ नेता अशोक गेहलोत हे पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षपदावरुन होत असलेलं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सध्या सुरु असून या बैठकीत पाचही राज्यात झालेल्या पराभवांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाते आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडतेय.

काँग्रेस पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी अध्यक्षपदी काँग्रेच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातीलच व्यक्ती असणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलं असून मी सध्या जेत करतो, तेच माझ्यासाठी चांगलं आहे, असंही अशोक गेहलोत यांनी म्हटलंय.

भाजपकडून मतांचं ध्रूवीकरण?

पंजाब बळकता इतर चार राज्यात भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय. यूपीसह, मणिपूर, गोवा या राज्यात भाजपनं मुसंडी मारली होती. मात्र भाजपच्या या विजयामागे मतांचं ध्रूवीकरण झालं असल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच गांधीच्या विचारांवर चालत आला आहे. राज, धर्म यावर काँग्रेसनं निवडणुका लढलेल्या नाहीत. सत्याचाच विजय होईल, असा विश्वासही गेहलोत यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांवर हल्लाबोल

दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी माध्यमांवरही हल्लाबोले केला आहे. मीडिया पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरकडे पंजाबात काँग्रेससह प्रस्थापितांना मात देणाऱ्या आप पक्षाचा काँग्रेसला कोणताही धोका नाही, असंही ते म्हणालेत. मीडिया आपला वाढीव कव्हरेज देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत, हसन मुश्रीफांची जोरदार फटकेबाजी

मुख्यमंत्री पदावरून प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंमध्ये शीतयुद्ध; जाहिरातीतून सावंतांचा फोटो गायब

VIDEO: सर्व पुरावे केंद्रीय गृहसचिवांना का दिले?, घोटाळ्यात कोण कोण अडकलंय: देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच उघड केलं कारण

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.