Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांनी सांगितले बंडामागचे कारण..! दोन मिनिटांमध्ये सर्व उलगडा

ठाकरे घरणाच्या अतिशय जवळचे म्हणून माझी ओळख होती. पण ईडीच्या चौकशी दरम्यान मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. त्या दरम्यानच्या काळात कोणी जवळ तर यायला तयार नव्हतेच पण माझ्यासोबत कोणी सल्फीदेखील काढायला तयार नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ज्यावेळी मला आदाराची गरज होती त्याचवेळी सर्वजण साथ सोडून गेले होते.

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांनी सांगितले बंडामागचे कारण..! दोन मिनिटांमध्ये सर्व उलगडा
प्रताप सरनाईक
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 3:43 PM

मुंबई : शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका का घेतली यामागचे कारण आता समोर येऊ लागले आहे. (Assembly) विधानसभेत शिंदे गट आणि भाजपाचे बहुमत झाल्यानंतर आमदारांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी (Pratap Sarnaik) प्रताप सरनाईक यांनी तर बंडमागचे कारण तर सांगितलेच पण ठाकरे कुटुंब कसे होते याचा देखील उलगडा कोला. दरम्यान, मतदा करताना प्रताप सरनाईक हे उभारले असता (ED) ईडी..ईडी अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. पण याचे उत्तर नंतर देतो म्हणणाऱ्या नाईकांनी ईडी दरम्यानचा काळच बंडासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगितले. ईडी कडून चौकशी सुरु असताना देण्यात आलेली दुय्यम वागणूक यामुळेच आपण निर्णय घेतल्याचे सांगितले. तर दुसरीकडे ठाकरेंशी कौटुंबिक संबंध असल्याचे म्हणत आपण त्यांच्याबद्दल नाराजी नाही हे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणी कशासाठी बंडाचा निर्णय घेतला हे आता समोर येऊ लागले आहे.

दुय्यम वागणुकीमुळेच मन व्यथित

ठाकरे घरणाच्या अतिशय जवळचे म्हणून माझी ओळख होती. पण ईडीच्या चौकशी दरम्यान मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. त्या दरम्यानच्या काळात कोणी जवळ तर यायला तयार नव्हतेच पण माझ्यासोबत कोणी सल्फीदेखील काढायला तयार नसल्याचे सरनाईक यांनी सांगितले. ज्यावेळी मला आदाराची गरज होती त्याचवेळी सर्वजण साथ सोडून गेले होते. कोणी फोनही उचलण्यास तयार नव्हते. मी देवासमोर प्रार्थना करीत होते की अशी वेळ कुणावरही येऊ नये. मात्र, त्या काळात कोणीही साथ दिली नसल्यानेच हा निर्णय घेतल्याचे नाईक म्हणाले.

असे होते ठाकरे कुटुंबाशी नाते

प्रताप सरनाईक आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध जवळचे होते. केवळ राजकारणच नाहीतर त्यांची मुले आणि आदित्य ठाकरे हे चांगले मित्र आहेत तर रश्मी ठाकरे आणि नाईक हे एकाच वर्गात शिकत होते. एवढे सर्व असतानाही जसे पाहिजे तसे सहकार्य ना शासनाकडून मिळाले ना पक्षातील इतरांकडून मिळाले. त्यामुळे किती दिवस सहन करायचे म्हणून हा टोकाचा निर्णय घेतला. असे असतानाही मात्र, त्यांनी ईडी कारवाईच्या धास्तीनेच हा निर्णय घेतल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात होता.

हे सुद्धा वाचा

म्हणून एकनाथ शिंदे यांची साथ

जेव्हा सर्वकाही संपत होते त्या प्रतिकूल परस्थितीमध्ये केवळ शिवसेनेतील एका नेत्याने साथ दिली तो म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. राजकारणामध्ये काहीही होईल पण मला गरजेच्या वेळी तेच धावून आले आहेत. त्यांनीच मायेची थाप मारल्यामुळे मी त्या कठीण प्रसंगातून सावरलो असल्याचेही नाईक म्हणाले. त्यांची आणि माझी राजकीय सुरवात एकत्र झाली होती. आज ठाणेकर महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे याचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. शिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आगामी 20 वर्ष सरकार चालवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.