NMMC Election 2022, Ward 16 : सत्ता कुणाची? फायदा कुणाला?; प्रभाग क्रमांक 16मध्ये काय घडणार?

NMMC Election 2022, Ward 16 : 2017च्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 16मधून विनया मनोहर माधवी या विजयी झाल्या होत्या. त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहे. आता प्रभाग पद्धतीमुळे या प्रभागात तीन वॉर्ड येणार आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत अधिकच रंजक होणार आहे.

NMMC Election 2022, Ward 16 : सत्ता कुणाची? फायदा कुणाला?; प्रभाग क्रमांक 16मध्ये काय घडणार?
सत्ता कुणाची? फायदा कुणाला?; प्रभाग क्रमांक 16मध्ये काय घडणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 8:08 AM

नवी मुंबई: नवी मुंबईवर माजी मंत्री गणेश नाईक (ganesh naik) यांचं वर्चस्व राहिलं आहे. नाईक यांच्याशिवाय नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) महापौर बनत नाही. नाईक ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता नवी मुंबई महापालिकेत असते. नाईक पूर्वी शिवसेनेत होते. तेव्हा नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेची (shivsena) सत्ता होती. नंतर नाईक राष्ट्रवादीत आले आणि नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. आता नाईक भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आपसूकच नवी मुंबईवर भाजपची सत्ता आली आहे. नवी मुंबई पालिकेत या पूर्वी वॉर्ड पद्धती होती. आता प्रभाग पद्धतीने नवी मुंबईत निवडणूक पार पडणार आहे. म्हणजे एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. प्रभाग पद्धतीचा प्रयोग नवी मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लढत रंजक होणार

2017च्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 16मधून विनया मनोहर माधवी या विजयी झाल्या होत्या. त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहे. आता प्रभाग पद्धतीमुळे या प्रभागात तीन वॉर्ड येणार आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत अधिकच रंजक होणार आहे.

प्रभाग क्रमांक 16 अ

हे सुद्धा वाचा
पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

महिलांचं वर्चस्व राहणार

नव्या प्रभाग क्रमांक 16मध्ये तीन आरक्षणे पडली आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधील अ मध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलं आहे. ब वॉर्ड हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर क वॉर्ड हा जनरल झाला आहे. त्यामुळे या प्रभागावर महिलांचं वर्चस्व राहणार असल्याचं दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक 16 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

25 हजार मतदार ठरवणार तीन नगरसेवक

प्रभाग क्रमांक 16मध्ये 25 हजार 446 मतदार आहेत. त्यापैकी 1870 मतदार अनुसूचित जातीचे आहेत. तर 189 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. म्हणजे या प्रभागातून कोणते तीन नगरसेवक निवडून द्यायचे हे या प्रभागातील 25 हजार मतदार ठरवणार आहेत.

प्रभाग क्रमांक 16 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/ इतर

असा आहे प्रभाग

प्रभाग क्रमांक 16मध्ये कौपरखैरणे सेक्टर-1, सेक्टर-1 ए, सेक्टर-2, सेक्टर-2 ए, सेक्टर -3, सेक्टर -4 सेक्टर 4 ए आदी भाग येतात. सत्यम टॉवर, ज्ञानविकास चौक ते तीन टाकीपर्यंतचा भागही या मतदारसंघात येतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.