BMC Election 2022 Ward 139: जागा एक, उमेदवार 22, 2017 मध्ये समाजवादी पक्षाची बाजी, वॉर्ड 139 वर यंदा मात्र महिला उमेदवाराची वर्णी!

मुंबई महापालिका वॉर्ड 139 इंडियन ऑईल नगरात 2011 मधील जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 47579 एवढी होती. अनुसूचित जातींची संख्या 5109 एवढी तर अनुसूचित जमातींची संख्या 610 एवढी होती.

BMC Election 2022 Ward 139: जागा एक, उमेदवार 22, 2017 मध्ये समाजवादी पक्षाची बाजी, वॉर्ड 139 वर यंदा मात्र महिला उमेदवाराची वर्णी!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 5:25 PM

मुंबईः महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation) जवळ येतेय, तशी इच्छुक उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीसाठी बड्या बड्या राजकीय पक्षांने मोठाले डावपेच आखायला सुरुवात केली आहे तर स्थानिक पातळीवर नगरसेवकांच्या मोर्चेबांधणीलाही चांगलाच वेग आहे. मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 139 (BMC ward 139) मधील उमेदवारही कामाला लागले आहेत. कारणही तसंच आहे. मागील वेळी नगरसेवकाच्या निवडणुकीत तब्बल 22 उमेदवारांनी नशीब आजमावलं होतं. जागा एक, उमेदवार बावीस झाल्यानं सर्वच उमेदवारांची मतं विभागली गेली आणि कुणा एकाला मताधिक्य मिळणं कठीण होतं. यातूनही समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) उमेदवारानं मुसंडी मारली आणि 869 मतांनी तो विजयी झाला. यंदादेखील महापालिकेच्या इंडियन ऑइल नगर या वॉर्डाची निवडणूक कशी होतेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागील वेळी कोण जिंकलं?

मुंबई महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या वॉर्डात अत्यंत चुरशीचा सामना पहायला मिळाला. नगरसेवकाच्या एकाच जागेसाठी अनेक उमेदवार उभे राहिल्यामुळे मतंही मोठ्या प्रमाणावर विभागली गेली. परिणामी कुणा एकाला विक्रमी मतदान झालं नाही. मात्र भारिप बहुजन पक्षाच्या उमेदवाराला मागे सारत समाजवादी पार्टीच्या पक्षानं निवडणूक जिंकली आणि नगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात घातली. यंदा आता हा वॉर्ड अनुसूचित जाती- महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी यांची संधी हुकणार, असं दिसतंय.

2017 मधील मताचं गणित कसं?

  •  अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी- समाजवादी पार्टी- 4782
  • अरुण विश्वनाथ कांबळे- भारिप बहुजन महासंघ- 3913
  • शिवसेना- सुरेश (बुलेट ) पाटील- 3733
  • शेख शरीफ इब्राहीम- एमआयएम- 2077
  • नायडू वेलुस्वामी सुभिया- काँग्रेस- 1542
  • राजेंद्र वामन वाघमारे- राष्ट्रवादी – 686
  • एकूण मतदार- 36,610

वॉर्ड आरक्षित की खुल्या प्रवर्गात?

यंदाच्या निव़डणुकीत वॉर्ड क्रमांक 139 हा अनुसूचित जाती आणि महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मागील वेळी निवडून आलेल्या अख्तर अब्दुलरज्जाक कुरेशी यांना यंदा ही निवडणूक लढवता येणार नाही. आता पक्ष इतर महिला उमेदवाराला ही संधी देऊ शकते. इतर पक्षांतील महिला उमेदवारही यानिमित्ताने आपलं नशीब आजमावू शकतील.

वॉर्डमधील लोकसंख्या किती?

मुंबई महापालिका वॉर्ड 139 इंडियन ऑईल नगरात 2011 मधील जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 47579 एवढी होती. अनुसूचित जातींची संख्या 5109 एवढी तर अनुसूचित जमातींची संख्या 610 एवढी होती.

वॉर्डमधील महत्त्वाचे भाग कोणते?

नटवर पारेख कंपाउंड, इंडियन ऑइल नगर, लोटस कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिवाजी नगर जंक्शन

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
समाजवादी पार्टीअख्तर अब्दुलरज्जाक कुरेशीविजयी उमेदवार- 2017
भारिप बहुजन महासंघअरुण विश्वनाथ कांबळे-
शिवसेनासुरेश (बुलेट) पाटील-
एमआयएमशेख शरीफ इब्राहीम-
काँग्रेसनायडू वेलुस्वामी सुभिया-
राष्ट्रवादी काँग्रेसराजेंद्र वामन वाघमारे-
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.