व्यासपीठावर ठाकरे नावाची व्यक्ती महत्वाची; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना निमंत्रित करण्याबाबत मनसेची भूमिका

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची भूमिका मांडली. हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.

व्यासपीठावर ठाकरे नावाची व्यक्ती महत्वाची; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंना निमंत्रित करण्याबाबत मनसेची भूमिका
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 7:53 PM

मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांच्यात घमासान सुरु असतानाच चर्चेत आले आहेत ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात(Shivsena Dasara Melava 2022) मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray ) यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे(sandeep deshpande) यांनी एका पत्राद्वारे मनसैनिकांची भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करावे अशी मनसैनिकांची भूमिका असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज ठाकरे हिंदूत्वाचा विचार करणारा नेता

दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात हिंदुत्वाची भूमिका मांडली. हिंदुत्वाचा विचार घेवूनच या ठिकाणी दसरा मेळावा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्यासारखा हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाकडून देण्यात आले आहेत.

संदिप देशपांडे यांनी देखील पत्राद्वारे मनसैनिकांची भूमिका

शिवतीर्थावर ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक येत असतात. यामुळे दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर ठाकरे नावाची व्यक्ती महत्वाची आहे. या अनुषंगाने राज ठाकरेंना यासाठी निमंत्रीत करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. संदिप देशपांडे यांनी देखील पत्राद्वारे मनसैनिकांची भूमिका मांडली आहे.

संदीप देशपांडे यांचे पत्र जसेच्या तसे

आदरणीय साहेब,

सविनय जय महाराष्ट्र!

वंदनीय हिंदू हृदय सम्राट कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते’ हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच आपल्या शिवतीर्थावर! दसन्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुतात उपळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदयसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं बाळकडू विचारांचं सोनं घेऊन घरी परतत.

दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणान्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतकं सगळं करूनही स्वतः चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच.

एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं पण आता “कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार असं म्हणत ‘यू टर्न’ आणि ‘बंडखोर असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनासमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगत ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?

वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिव सेना या चार अक्षरावर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेच आहे. हिंदूची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनाचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे. ती म्हणजे आपण हिंदुजननायक श्रीमान राजसाहेब. ठाकरे! म्हणूनच कोटाची हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकाची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसन्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट के बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे.

दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक ठाकरी शैलीतील वकृत्वाच्या तेजःपुंज आविष्काराची. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातानी…” या हाकेची महाराष्ट्र आणि अवधा हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत. धन्यवाद!

आपला नम्र, महाराष्ट्र सैनिक,

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.