MNS : बीएमसीत शिंदे गट मनसेला सोबत घेण्याच्या मनसुब्यात? गणपती दर्शनासाठी देशपांडे-धुरी यांची ‘वर्षा’वारी

BMC Election 2022 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्षावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची यावेळी मनसे नेत्यांनी भेट घेतली. यावेळी माजी आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर आणि शिंदे-भाजप गटाचे समन्वयक आशिष कुलकर्णीही सोबत होते.

MNS : बीएमसीत शिंदे गट मनसेला सोबत घेण्याच्या मनसुब्यात? गणपती दर्शनासाठी देशपांडे-धुरी यांची 'वर्षा'वारी
संदीप देशपांडे शिंदेंच्या भेटीलाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 8:25 AM

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीचे (BMC Election 2022) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अशातच मनसे (MNS Leaders) नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गणपती दर्शनासाठी देशपांडे-धुरी यांनी वर्षावर हजेरी लावली. या वेळी बराच वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देशपांडे आणि धुरी यांची चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी गुरुवारी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्षावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची यावेळी मनसे नेत्यांनी भेट घेतली. यावेळी माजी आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर आणि शिंदे-भाजप गटाचे समन्वयक आशिष कुलकर्णीही सोबत होते.

मनसे नेत्यांच्या ‘वर्षा’वारीचं कारण गणपती दर्शन असलं तरी त्याचे राजकीय अर्थही आता काढले जात आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे-शिंदे गट एकत्र येणार का, याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मनसे आणि शिंदे गटाच्या युतीचे बंध अधिक घट्ट होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारता जातोय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

नुकतीच राज ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट दिली होती. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या घरी गणपती दर्शन केलं होतं. या भेटीचेही राजकीय पैलू काय आहे, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं. तर दुसरीकडे मुंबईत राज ठाकरे यांनीही लालबाग, परेल भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या होत्या.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडींचा एकमेकांशी दूरगामी काय संबंध लागतो, यावरुन आतापासून चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात शिंदे गट आणि मनसे यांच्यातील राजकीय समीकरण नेमकं काय रुप घेत, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.