Sandeep Deshpande : तेल लावलेले पैलवान, गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान, संदीप देशपांडेंचं ट्विट चर्चेत

"तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे" असा आशय संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे.

Sandeep Deshpande : तेल लावलेले पैलवान, गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान, संदीप देशपांडेंचं ट्विट चर्चेत
तेल लावलेले पैलवान, गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान, संदीप देशपांडेंचं ट्विट चर्चेतImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:50 AM

मुंबई – बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आयोध्या दौऱ्याला विरोध केल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलं आहे. युपी यायचं असेल तर पहिली जनतेची माफी मागा, नाहीतर इथल्या साधू संतांची माफी मागा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली. त्यानंतर यामागे नेमकं कोण आहे याची चर्चा देखील राजकारणात सुरू झाली. त्यावर मनसेच्या अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधानं देखील केली आहे. भाजपचे खासदार आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्याने राज ठाकरेंना दौरा स्थगित करावा लागला. त्याबाबत आज मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये “त्यांनी तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांना विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असा आशय लिहिला आहे. राज ठाकरेंनी पुण्यात झालेल्या सभेत मराठी पोरांना अडकवण्यचा प्रयत्न असल्याचे जाहीर केले होते. तसेच निवडणुकीच्या तोंडावर केसेस पडण परवडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. <

संदीप देखपांडेंचं खोचक ट्विट

“तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” असा आशय संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे. तसेच कुस्ती आखाड्यातील एक फोटो त्या आशयासोबत जोडला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बृजभूषण सिंह हे देखील फोटोत दिसत आहेत. महाराष्ट्रातील एका कुस्ती आखाड्यातील तो फोटो असण्याची शक्यता आहे. व्हायरल झालेल्या फोटोबाबत संजय राऊत यांनी स्षष्टीकरण दिलं आहे. आम्ही सुद्धा अनेकदा खासदारांना भेटलो आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. समजा उद्या मी योगी आदित्यनाथ यांना भेटलो तर त्यांना मी रसद पुरवली असं ते म्हणतील.

महाराष्ट्रातल्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती

भाजपच्या खासदारामागे महाराष्ट्रातल्या नेत्याचा हात असल्याची चर्चा होती. परंतु संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये फोटो शेअर केल्याने चर्चेला उधान आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जूनला होणारा अयोध्या दौरा आयोजित केला होता. परंतु भाजपच्या खासदारांनी तिथं विरोध केला.

तसेच त्यांच्या विरोधाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी चांगलं समर्थन दिल्याने, त्याचा नियोजित दौरा होणार की नाही याबाबत अनेकांना शंका होती. परंतु पुण्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी नियोजित स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.