Vidhan Parishad Election : आज शिवसेनेचा 56वा वर्धापनदिन, उद्या विधान परिषदेची परीक्षा! जाणून घ्या TOP 10 राजकीय घडामोडी

Vidhan Parishad Election 2022 : सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान पार पडेल

Vidhan Parishad Election : आज शिवसेनेचा 56वा वर्धापनदिन, उद्या विधान परिषदेची परीक्षा! जाणून घ्या TOP 10 राजकीय घडामोडी
महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 7:19 AM

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय (Maharashtra Politics) रणसंग्रम पाहायला मिळतोय. राज्यसभेनंतर होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या (Vidhan Parisha Election) पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. किती उमेदवार रिंगणात आहेत? एकूण विधान परिषदेच्या जागा किती आहेत? मतदान कधी होणार आहे? विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल (Vidhan Parishad Election 2022 News) कधी लागणार आहे? या प्रश्नांसोबतच नेमक्या राजकीय पार्श्वभूमीवर घडत असलेल्या महत्त्वाच्या 10 घडामोडी कोणत्या आहेत, ते जाणून घेणार आहोत, TOP 10 मुद्द्यांमधून…

TOP 10 राजकीय घडामोडी :

  1. शिवसेनेचा वर्धापनदिन : आज शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. पवईतल्या वेस्ट इन या हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांचा मुक्कम आहे. दरवर्षी दणक्यात शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा होतो. पण उद्या विधानपरिषदेची निवडणूक असल्यामुळे वेस्ट ईम हॉटेलमध्येच शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडेल. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संबोधनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोरोनामुळे गेली दोन वर्ष वर्धापनदिन सोहळा झाला नव्हता. यंदा हा वर्धापनदिन सोहळा हॉटेलमध्येच पार पडणार आहे.
  2. जागा 10, उमेदवार 11 : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरस वाढली आहे. दहा जागांसाठी अकरा उमेदवार विधान परिषदेच्या मैदानात उतरलेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेतच विधान परिषदेची निवडणूकही रंगतदार होणार आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेत दगाफटका टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पहिल्या फेरीतील विजयासाठी आवश्यक असणाऱ्या मतांच्या कोट्यापेक्षा अतिरिक्त मतांची जमवाजमव करण्यासाठी रणनीती आखील जातेय.
  3. छोट्यांवर लक्ष : एमआयएमची दोन, बहुजन विकास आघाडी तीन आणि समाजवादी पार्टीची दोन मतं, अशी एकूण सात मतं कुणाच्या पारड्यात पडणार, यावर विधान परिषद निवडणुकीचं गणित अवलंबून राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे या पक्षांची मतं कोण मिळवतं आणि राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत चमत्कार कोण घडवतं, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
  4. वेस्ट ईन हॉटेलात मुक्काम : शिवसेनेचे आमदार वेस्ट इन हॉटेलात मुक्कामाला आहेत. तसंच आदित्य ठाकरेही याच हॉटेलात मुक्कामाला आहेत. आदित्य ठाकरेंनी शिवसेना आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. मतदान करताना कोणती खबरदारी घ्यायची आहे, याचं ट्रेनिंग सध्या आमदारांना दिलं जातंय. पवईच्या वेस्ट ईन हॉटेलमध्ये राजकीय घडामोडींना सध्या वेग आलाय.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मतांचं गणित : शिवसेना आमदार आणि अपक्ष मिळून शिवसेनेकडे 62 मतं आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि अपक्षांची चार मतं मिळून राष्ट्रवादीकडे 55 मतं आहेत. काँग्रेसकडे 44 मतं आहे. काँग्रेसकडे अपक्ष आमदारांची मतं नाही. दोन जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला आठ मतांची गरज भासणार आहे. भाजपचे 105 आमदार असून त्यांना पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी 135 मतांची गरज लागणार आहे. पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला सगळी मतं बाहेरुन मिळवण्यासाठी जुळवाजुळव करावी लागेल. राज्यसभेप्रमाणे मिळालेली मतं कायम राहिली, तरिही भाजपाल आणखी 12 मतांची गरज लागणार आहे.
  7. खडसेंसमोर आव्हान : एकनाथ खडसेंना रोखण्यासाठी भाजपकडून फिल्डिंग लावली जातेय. राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याआधी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर खडसेंना घेतलं जावं, असेही प्रयत्न झाले होते. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना यश येऊ दिलं नाही. आता राष्ट्रवादीने पुन्हा एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच खडसेंची ही निवडणूक जिंकणं हे देखील एक आव्हानच असणार आहे.
  8. भाजप नेत्यांना ट्रेन प्रवास : दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी वाहतूक कोंडीचा फटका बसू नये, यासाठी चक्क लोकलचा पर्याय अवलंबला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते गिरीश महाजन यांनी विरारला जाऊन बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. ट्रॅफिकमध्ये अडकण्याची चिंता नको म्हणून चक्क भाजप नेत्यांनी चर्चगेट ते विरार असा ट्रेनने प्रवास केला.
  9. अपक्ष कुणाच्या बाजूने? : नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना न्यायालयानं मतदान करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची हक्काची मतं कमी झाली आहेत. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देत असलेल्या अपक्ष आमदारांना राष्ट्रवादीकडून संपर्क साधला गेल्याचा दावा केला जातोय. मात्र शिवसेनासमर्थक अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केल्याचंही बोललं जातंय. मुख्यमंत्री सांगतील तिथे मतदान करु, असं शिवसेनासमर्थक आमदारांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
  10. मतांचा कोटा वाढवण्याचे प्रयत्न : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एक मत बाद ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे आता मत बाद होऊ नये यासाठी कोटा वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचीही माहिती मिळतेय. या निवडणुकीत 26 मतांचा कोटा आहे. पण उमेदवाराला जास्त कोटा कसा देता येईल, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
  11. महत्त्वपूर्ण गाठी-भेटी : शरद पवारांच्या गाठी भेटी वरीष्ठ नेत्यांनी घेतल्या आहेत. काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी शरद पवारांची शनिवारी भेट घेत चर्चा केली होती. तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवारांची भेट चर्चा केली. तर बाळासाहेब थोरातही शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. या तिन्ही भेटी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत मात देण्यात भाजपला यश येतं का? हे आता सोमवारी स्पष्ट होणार आहे. सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान पार पडेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.