UMC Election 2022, Ward 29 : विजयाची माळ कुणाच्या गळ्यात? कलानी गटाची भूमिका निर्णायक ठरणार
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ही एक महत्वाची महापालिका आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सत्तेत झालेल्या बदलाचे पडसाद उमटतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील विकसनशील महापालिकांमध्ये उल्हासनगर महापालिका (Ulhasnagar Municipal Corporation)ही आघाडीवर आहे. या महापालिकेत एकूण 30 पॅनल करण्यात आले असून, त्याद्वारे एकूण 89 नगरसेवक (Corporators) निवडून महापालिकेवर जाणार आहेत. पालिकेच्या नवीन सभागृहात सर्वसाधारण प्रवर्गासाठी 49, ओबीसी प्रवर्गासाठी 24, अनुसूचित जाती (एससी) 15 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी (एसटी)-1 अशाप्रकारे सदस्य असणार आहेत. या महापालिकेतील निवडणुकीत स्थानिक गटाची भूमिका निर्णायक ठरते. या पालिकेच्या क्षेत्रात कलानी गटाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे पालिकेच्या यंदाच्या निवडणुकी (Election)त देखील राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच कलानी गटाची आणि भारत गंगोत्री गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अलीकडेच कलानी गटाच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपाला मोठा झटका दिला होता. त्यामुळे राज्यात आणि देशात इतरत्र भाजपचा विजयी रथ उधळला असला तरी उल्हासनगर महापालिकेत भाजपाला स्थानिक गटांच्या आव्हानापुढे टिकणे कठीण जाईल, असे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 29 मधील परिस्थितीचा थोडक्यात घेतलेला आढावा.
उल्हासनगर महापालिका वॉर्ड 29 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
महापालिकेतील प्रभाग व आरक्षण रचना
प्रभागांची संख्या – 30 सदस्य संख्या – 89 अनुसूचित जमाती – 01 (महिला) अनुसूचित जाती – 15 (8 महिला) सर्वसाधारण महिला – 36 सर्वसाधारण खुल्या जागा – 37
महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
भाजप – 32 शिवसेना – 25 काँग्रेस – 1 राष्ट्रवादी – 4 मनसे – 0 इतर – 16
उल्हासनगर महापालिका वॉर्ड 29 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
प्रभाग क्रमांक 29 मधील लोकसंख्या
एकूण लोकसंख्या – 16748 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 1268 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 88
प्रभाग क्रमांक 29 मधील प्रमुख परिसर
या प्रभागामध्ये मत मंदिर, साई वासन शाह दरबार, श्री गुरु नानक दरबार, स्वामी शांती प्रकाश आश्रम, स्वामी शांती प्रकाश गौशाला, झुलेलाल मंदिर, झुलेलाल गार्डन, माहेश्वरी हॉस्पिटल, आदी प्रमुख परिसरांचा समावेश होतो.
उल्हासनगर महापालिका वॉर्ड 29 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
प्रभाग क्रमांक 29 मधील आरक्षण
वॉर्ड 29 अ – सर्वसाधारण महिलांसाठी राखीव वॉर्ड 29 ब – सर्वसाधारण महिलांसाठी राखीव वॉर्ड 29 क – सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली
उल्हासनगर हे उल्हासनदी व वालधुनी नदीच्या काठावर वसलेले एक प्रमुख आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ 13 चौरस किमी इतके असून 2001 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या 4.72 लाख इतकी आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ही एक महत्वाची महापालिका आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सत्तेत झालेल्या बदलाचे पडसाद उमटतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. एकंदरीतच स्थानिक कलानी आणि गंगोत्री गटांचे प्राबल्य आणि राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे यामुळे उल्हासनगर महापालिकेची निवडणूक नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे.