kdmc election 2022 ward 14 | कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 14 वर मनसेचं इंजिन चालणार की शिंदे गट प्रभावी ठरणार?

यंदा त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र मागील वेळी प्रभाग क्रमांक 14 मध्ये मनसेच्या सुनंदा कोट यांचा विजय झाला होता. यंदा प्रभाग रचनेत नवा भाग समाविष्ट झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे.

kdmc election 2022 ward 14 | कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 14 वर मनसेचं इंजिन चालणार की शिंदे गट प्रभावी ठरणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 3:59 PM

मुंबईः महाराष्ट्र राज्यात मोठं सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेशी (Shivsena) फारकत घेतलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गट आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय करिश्मा दाखवतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईसहित ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांमध्येही (Kdmc Election) शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मुंबईतील मराठी माणसांची मतं आणि शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं ही कुरघोडी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. आता एवढ्या मोठ्या खेळीचा महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला काय फायदा होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील इतर पालिकांप्रमाणेच कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुकीचा बिगुलदेखील वाजला आहे. मुंबईप्रमाणेच याही निवडणुकीला महत्त्व आहे. केडीएमसी महापालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी 13 अनुसूचित जाती तर 4 वॉर्ड अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. महिलांसाठी 67 वॉर्ड राखीव आहेत. केडीएमसी महापालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. या महापालिकेतील एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 एवढी आहे. तर येथील अनुसूचित जातींची संख्या 1 लाख 50 हजार 171 एवढी आहे. महापालिकेतील अनुसूचित जमातींची संख्या 42 हजार 584 एवढी आहे. सध्या कल्याण महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मागील वेळच्या निवडणुकीत एक सदस्यीय प्रभागरचना होती. यंदा मात्र तीन वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात आला आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 14 मध्ये मागील वेळची शिवसेनेची सत्ता टिकून राहिल का भाजपचा वरचश्मा होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोणता परिसर?

वडवली पूर्व भागातील चिखलेबाग, मल्हारवगर, बैलबाजार, जोशीबाग आदी परिसर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये येतो. यात रहेजा कॉम्प्लेक्स, सर्वोदय कॉम्प्लेक्स, सांगळेवाडी, ओकबाग, जुना आरटीओ, झुंझारराव मार्केट, जुना स्टेशन रोड, कल्याण पश्चिम स्टेशन परिसर, जोशीबाग, जिजामाता कॉलनी, मल्हारवगर, चिखलेबाग, एकविरा वगर, हिरा बाग, आगलावे बाग, संतोषी माता मंदिर परिसर, जैन सोसायटी आदी भाग येतो.

प्रभाग क्रमांक 14ची लोकसंख्या?

प्रभाग क्रमांक 14 मधील एकूण लोकसंख्या 31 हजार 882 एवढी आहे. अनुसूचित जातींतील मतदारांची संख्या 8828 तर अनुसूचित जमातींची संख्या 574 एवढी आहे.

मागील निवडणुकीचे चित्र काय?

राज्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील 2015 सालच्या निवडणुकीत शिवसेनेची सत्ता होती. 122 वॉर्डांसाठी तब्बल 750 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. या निवडणुकीत शिवसेनेचा सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मागील वेळचे पक्षीय बलाबल असे-

  • शिवसेना- 52
  • भाजप- 42
  • काँग्रेस- 04
  • राष्ट्रवादी काँग्रेस- 02
  • MIM- 01
  • मनसे- 09
  • एकूण – 122

यंदा त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र मागील वेळी प्रभाग क्रमांक 14 मध्ये मनसेच्या सुनंदा कोट यांचा विजय झाला होता. यंदा प्रभाग रचनेत नवा भाग समाविष्ट झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे.

प्रभाग 14 मधील आरक्षण कसे?

  • प्रभाग 14 अ- सर्व साधारण महिला
  • प्रभाग 14 ब- सर्वसाधारण महिला
  • प्रभाग 14 क- अनारक्षित

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 14 अ

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 14 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 14 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.