Minister Portfolios : केसरकरांचं ‘पर्यटना’चं स्वप्न हवेत, गुलाबरावांकडे तेच ते, तेच ते; तर आरोप झालेल्या सत्तार, राठोडांवर शिंदे मेहरबान

Minister Portfolios : नव्या सरकारमध्ये दीपक केसरकर यांना पर्यटन खाते मिळेल अशी चर्चा होती. केसरकर हे सुद्धा पर्यटन खात्यासाठी आग्रही होते. कोल्हापुरात माजी खासदार संभाजी छत्रपती यांना भेटल्यावर केसरकर यांनी आपल्या मनातील इच्छा बोलूनही दाखवली होती.

Minister Portfolios : केसरकरांचं 'पर्यटना'चं स्वप्न हवेत, गुलाबरावांकडे तेच ते, तेच ते; तर आरोप झालेल्या सत्तार, राठोडांवर शिंदे मेहरबान
केसरकरांचं 'पर्यटना'चं स्वप्न हवेत, गुलाबरावांकडे तेच ते, तेच ते; तर आरोप झालेल्या सत्तार, राठोडांवर शिंदे मेहरबान Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 6:28 PM

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप (Maharashtra Minister Portfolios) झालं आहे. या खाते वाटपात शिंदे गटाच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत. मात्र, शिंदे गटातील काही मंत्र्यांना त्यांना हवी असलेली खाती काही मिळालेली नाहीत. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांना पर्यटन खातं हवं होतं. मात्र, हे खातंच भाजपच्या कोट्यात गेलं आहे. त्यामुळे केसरकर यांना पर्यटन खातं मिळू शकलं नाही. तर बंड केल्यानंतर शिवसेनेच्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या गुलाबराव पाटील यांना यावेळी चांगलं खातं मिळेल असं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांना पूर्वीचच पाणीपुरवठा खातं देण्यात आलं आहे. तर अब्दुल सत्तार (abdul sattar) आणि संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर आरोप होऊनही त्यांना चांगली खाती देण्यात आली आहे. उदय सामंत आणि शुंभराज देसाई यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी विशेष मेहरबानी दाखवत त्यांना चांगलं खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या खाते वाटपावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नव्या सरकारमध्ये दीपक केसरकर यांना पर्यटन खाते मिळेल अशी चर्चा होती. केसरकर हे सुद्धा पर्यटन खात्यासाठी आग्रही होते. कोल्हापुरात माजी खासदार संभाजी छत्रपती यांना भेटल्यावर केसरकर यांनी आपल्या मनातील इच्छा बोलूनही दाखवली होती. मात्र, ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण आणि पर्यटन खाते एक होते. त्यात आता विभागणी करण्यात आली आहे. पर्यावरण खातं शिंदे गटाकडे देण्यात आलं आहे. तर पर्यटन खातं भाजपच्या वाट्याला आहे. भाजपने पर्यटनाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. तर, केसरकर यांना शालेय शिक्षण आणि मराठी भाषा हे खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यटन खातं मिळण्याचं केसरकर यांचं स्वप्न हवेत विरलं आहे.

हे सुद्धा वाचा

गुलाबरावांकडे तेच ते, तेच ते

शिवसेनेविरोधात बंड झाल्यानंतर गुलाबराव पाटीलही बंडखोर आमदारांना जाऊन मिळाले. ठाकरे सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री असतानाही मंत्रीपदाला लाथ मारून गुलाबराव पाटील शिंदे गटात आले होते. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेकडून या आमदारांवर जोरदार टीका करण्यात येत होती. त्यावेळी शिंदे यांच्या बाजूने गुलाबराव पाटील यांनी आक्रमकपणे बाजू मांडली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांना शिंदे चांगलं खातं देतील अशी चर्चा होती. मात्र, गुलाबराव पाटील यांच्या पोर्ट फोलिओमध्ये काहीच बदल करण्यात आला नाही. त्यांना पूर्वीचंच पाणी पुरवठा खातं देण्यात आलं आहे.

राठोड, सत्तार आणि सामंतांवर मेहरबान

या खाते वाटपात शिंदे यांची सर्वाधिक मेहरबानी अब्दुल सत्तार, संजय राठोड, उदय सामंत आणि शंभुराज देसाई यांच्यावर झाली आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप होऊनही त्यांना शिंदे यांनी चांगली खाती दिली आहेत. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेल्या व्यक्तीचा मंत्रिमंडळात समावेश कसा करता? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. मात्र, राठोड यांना अन्न व औषध प्रशासन खातं देण्यात आलं आहे.

तर, टीईटी घोटाळ्यात सत्तार यांचा मुलगा आणि मुलींची नावे आली होती. तरीही सत्तार यांना राज्यमंत्रिपदावरून थेट कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. तसेच त्यांना कृषी खाते देण्यात आलं आहे. उदय सामंत यांना उद्योग, शंभुराज देसाई यांना राज्य उत्पादन शुल्क आणि तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आदी महत्त्वाचं खातं शिंदे यांनी लढलं आहे. शिवसेनेविरोधात आक्रमकपणे भूमिका घेणाऱ्या आणि शिंदे गटाची व्यवस्थित बाजू मांडणाऱ्या केसरकर आणि गुलाबराव पाटील यांना महत्त्वाची खाती न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कुणाला कोणतं खातं

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा: पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.